Vetal Tekdi Pune | वेताळ टेकडीवरील २५० पोल्सचे बांधकाम तात्काळ थांबविण्याबाबत नगरविकास प्रधान सचिव व पुणे मनपा आयुक्त यांना लेखी सूचना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Vetal Tekdi Pune | बालभारती ते पौड फाटा लिंक रोडबाबत (Balbharti to Poud Phata Link Road) महानगरपालिकाकडे (Pune PMC News) प्राप्त हरकतींबाबत सविस्तर सुनावणी होईपर्यंत सदर टेकडीवरती कोणतेही कामकाज करण्यात येऊ नये, तसेच वृक्षतोडही न करण्याबाबत सूचना संबंधितांना तात्काळ देण्यात याव्यात अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी नगरविकास विभाग प्रधान सचिव (Urban Development Department Principal Secretary) आणि पुणे मनपा आयुक्तांना (Pune Municipal Commissioner) पत्राद्वारे दिल्या आहेत. (Vetal Tekdi Pune)

 

बालभारती ते पौड फाटा लिंक रोडबाबत रेखांकन करण्याचे काम सध्या सुरू असून त्यानुषंगाने वेताळ टेकडीवरती २५० काँक्रीट पोल्स (Concrete Poles) उभे करून रस्त्याचे रेखांकन करण्यात येणार आहे. याबाबत २५ एप्रिल रोजी पत्राद्वारे न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे वृक्षतोड करू नये तसेच रहदारी कमी करण्यासाठी सदर रस्त्याचा उपयोग किती होणार आहे याचेही सर्वेक्षण करावे असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले होते. तसेच पुणे शहरातील पर्यावरण संरक्षणामध्ये काम करणाऱ्या संस्थांना सहभागी करून त्यांचे हरकतीचा सकारात्मक विचार करण्याबाबत सूचित करण्यात आले होते. त्यानुसार हरकतींवर सुनावणी होईपर्यंत कोणतेही काम न करण्याचा आणि याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याच्या सूचनादेखील त्यांनी संबंधितांना दिल्या आहेत.

 

Web Title :  Vetal Tekdi Pune | Written notice to Principal Secretary Urban Development and
Pune Municipal Commissioner to immediately stop construction of 250 poles on Vetal Tekdi Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा