स्थापना दिवशीच भाजप सोडण्याचं दु:ख – शत्रुघ्न सिन्हा

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – स्थापना दिनीच भाजपला सोडचिठ्ठी देत आहे. आजच्याच दिवशीच मी भाजप सोडत असल्याचे मला दु:ख झाले आहे. मात्र मला आता पक्षातून काढून टाकण्याच्या धमक्या मिळणार नाहीत याचा आनंद वाटतो. असा टोला प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी लगावला. कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांन ही भावना व्यक्त केली.

भाजप सोडून त्यांनी आज कॉंग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल आणि प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्या उपस्थितीत त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की भाजपमधील दिग्गज नेत्यांचा अपमान करण्यात आला आहे. भाजप सध्या वन मॅन शो आणि टू मॅन आर्मी झाला आहे. अनेक मंत्री घाबरलेले आहेत. सरकारमधील सगळे निर्णय पंतप्रधान कार्यालयातून घेतले जातात. भाजपचे वरिष्ठ नेते आज मागदर्शन मंडळात आहेत. भाजपमध्ये लोकशाही राहिलेली नसून तिचं रुपांतर हुकुमशाहीत झालेलं आहे. मी आजवर देशाचा विचार केला. माझ्या स्वत:साठी काहीही मागितलं नाही. आजवर देशहिताचाच विचार केला आहे. अशी टिका त्यांनी केली.