सुधा चंद्रनचे वडील अभिनेते के.डी. चंद्रन यांचे निधन, हृदय विकाराच्या झटक्याने झाला मृत्यू

नवी दिल्ली : अभिनेत्री सुधा चंद्रन यांचे वडील आणि अभिनेते के.डी. चंद्रन यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. सुधा चंद्रनने त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. तिने म्हटले की, रविवारी सकाळी हृदय विकाराचा झटका आल्याने के.डी. चंद्रन यांचे निधन झाले. ते 86 वर्षाचे होते. के.डी. चंद्रन यांचे निधन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना झाले.

सुधा चंद्रनने सांगितले की, वडील के.डी. चंद्रन यांची प्रकृती काही दिवसांपासून ठिक नव्हती. 12 मे रोजी त्यांना जुहूच्या क्रिटी केयर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना डिमेंशिया म्हणजेच स्मृतभ्रंशाचा आजार होता. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीत त्यांच्यावर उपचार सुरू होते, येथे सकाळी सुमारे 10 वाजता हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.

या चित्रपटांमध्ये दिसले के.डी. चंद्रन

के.डी. चंद्रन यांनी कोई मिल गया, चायना गेट, कॉल, हम हैं राही प्यार के, तेरे मेरे सपने, जुनून, हर दिल जो प्यार करेगा, शरारत, मैं माधुरी दिक्षित बनना चाहती हूं, या चित्रपटांमध्ये काम केले होते. छोट्या भूमिकांसह के.डी. चंद्रन यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. मोजक्याच चित्रपटांतून काम करूनही, लोकांमध्ये त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती