ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंनी दान केली 2 एकर जमीन ! जाणून घ्या काय आहे प्रकरण

पोलीसनामा ऑनलाइन – ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले वृद्ध कलाकार, बॅकस्टेज कलाकार यांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. त्यांनी स्वत:च्या मालकीची दोन एकर जमीन दान केली आहे. यातील एक एकर जमीन ही वृद्ध कलावंतांसाठी आश्रम बांधण्यासाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाला दिली आहे तर दुसरी एक एकर जमीन ही सिने अँड टीव्ही आर्टीस्ट असोसिएशन म्हणजेच सिंटाला दिली आहे.

अनेक कलाकार असे आहेत जे वृद्धापकाळात कष्ट सहन करतात. याच कलाकारांच्या मदतीसाठी विक्रम गोखले पुढे आले आहेत. त्यांनी नाणे गावातील पौड जवळील एक एकर जमीन ही आश्रम बांधण्यासाठी दिल्याचं चित्रपट महामंडळाला कळवलं आहे.

विक्रम गोखले यांच्या या जमीनीची आजची किंमत पाहिली तर 2.5 कोटींहून कमी नाही. या ठिकाणी ज्येष्ठ आणि एकटे राहणाऱ्या कलावंतांना आसरा आणि सहारा मिळावा म्हणून ज्येष्ठ कलावंतांची राहण्याची सोय मोफत केली जाणार आहे. यासाठी विक्रम गोखले यांनी पौडजवळील प्लॉट चित्रपट महामंडळाच्या नावे करण्याचं ठरवलं आहे. महामंडळानं त्यांचे आभारही मानले आहेत.

विक्रम गोखले यांचे वडिल ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले देशाप्रति कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी दरवर्षी आपल्या कमाईतील काही भाग भारतीय सैन्यदलाला मदत म्हणून दरवर्षी देत असे. त्यांच्यानंतर विक्रम गोखले यांनी हा वासरा पुढे चालूच ठेवला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like