मौसमी चॅटर्जीवर जावई ठोकणार आब्रुनुकसानीचा दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांची मुलगी पायल मुखर्जी हिचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांची मुलगी पायल खुप काळ आजारी होती. त्यामुळे ती कोमात गेली होती. यानंतर मौसमी यांनी पायलचे पती यांच्याविरोधात कोर्टात केस दाखल केली होती. मात्र आता पायलच्या पतीने मौसमी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्याची तयारी सुरु केली आहे.

पायल 2018 मध्ये कोमात गेली होती. तिचा पती डिकी सिन्हा तिला रुग्णालयातून घरी घेऊन आला होता. मात्र पती डिकी पायलची योग्य काळजी घेत नसल्यामुळे डिकीने पायलवरचे उपचार बंद केल्याचा आरोप करत मौसमी यांनी मुंबई हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. हा वाद बरेच दिवस सुरु होता. याचदरम्यान पायलचे निधन झाले. तिच्या मृत्यूनंतर पती डिकी सिन्हाने मौसमी यांच्यावर आरोप केले होते.

एका मुलाखतीमध्ये डिकी म्हणाला की, ‘मी आत्तापर्यंत काहीच बोललो नाही कारण मी पत्नीची काळजी घेण्यात व्यस्त होतो. पायलच्या निधनानंतर विधी पुर्ण करण्यासाठी मला काही दिवस लागणार आहे. पण जानेवारीमध्ये मी मौसमी यांच्यावर मानहानीचा दावा ठोकणार आहे. मी मनाचा निश्चय केला आहे.’

डिकीने पुढे सांगितले की, ‘माझ्यात आणि सासरच्या मंडळींमध्ये फार काही ठिक नव्हते. खरे तर मला त्यांच्याबद्दल काही समस्या नव्हती. मी केस जिंकली होती. पायल माझ्यासोबत राहत होती. ती शेवटच्या क्षणापर्यंत माझ्यासोबत होती. मौसमी पायलची आई होती. पण तिच्या मृत्यूनंतर त्यांनी तिचा चेहरा पाहिला नाही. त्या अंतिम संस्कारालाही आल्या नव्हत्या. पायल जिवंत होती तेव्हा तिची बहिण मेघा हिने पायलला जबरदस्तीने प्रसाद खाऊ घातला. त्यानंतर पायल जास्तप्रमाणात गंभीर झाली. मी पायलची जशी काळजी घेत होतो सगळ्यांनी माझे कौतुक केले होते. यानंतर मौसमी यांनी माझ्याशी वाद सुरु केले आणि हे वाद चव्हाट्यावर आणले. मी पहिल्यांदाच यावर बोलत आहे. स्वतःला सिद्ध करण्यासाठी नाही तर सत्य समोर यावे केवळ यासाठी.’

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/