‘सावळे सुंदर रूप मनोहर’ गाण्याच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड पहिल्यांदाच दिसणार अल्बम सॉंग मध्ये (व्हिडिओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Nishigandha Wad | आषाढी एकादशी जवळ आली की वारकऱ्यांना पंढरीच्या विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागते. वारकऱ्यांसाह संपूर्ण महाराष्ट्राच्या मनातील उत्कट भावना ‘सावळे सुंदर रूप मनोहर’ या गाण्यातून उलगाडण्यात आल्या आहेत. या अप्रतिम गाण्याची निर्मिती सॉंग सिटी मराठी आणि शशिकांत वळतकर यांनी केली आहे. अजित पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या या सुंदर अशा गाण्यांचे वैशिष्ट्ये म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड (Nishigandha Wad) या गाण्याच्या माध्यमातून पहिल्यांदाच एका अल्बम सॉंग मध्ये दिसणार आहेत. ‘सावळे सुंदर रूप मनोहर’ या गाण्याची निर्मिती अभिनेते दीपक देऊळकर यांच्या संकल्पनेतून झाली आहे.

‘सावळे सुंदर रूप मनोहर’ हे सॉंग सिटी मराठी आणि शशिकांत वळतकर यांची निर्मिती असलेले ह्रदयास्पर्शी गाणे ‘संगीत मराठी’ या वाहिनीवर आणि ‘सॉंग सिटी मराठी’ या यूट्यूब चॅनलवर रसिकांना बघायला मिळणार आहे. दिग्दर्शक अजित पाटील आणि त्यांच्या टीमने रसिकांच्या मनाचा ठाव घेणारे हे गाणे अतिशय कमी कालावधीत पूर्ण केले आहे.

अभिनेते दीपक देऊळकर यांच्या संकल्पनेतून संगीतकार श्रीकृष्ण चंदात्रे यांनी ‘सावळे सुंदर रूप मनोहर’ हे गाणे संगीतबद्ध केले आहे, सोनाली चंदात्रे यांनी आपल्या सुमधुर आवाजात रसिकांना मंत्रमुग्ध करणारे गीत गायले आहे. या गाण्यांचे कालादिग्दर्शन वैभव शिरोळकर, छायांकन साईनाथ माने यांनी केले असून संकलन अमोल निंबाळकर यांनी केले आहे.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

या गाण्याबद्दल बोलताना दिग्दर्शक अजित पाटील म्हणाले,
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आम्ही ‘सावळे सुंदर रूप मनोहर’ हे गाणे मराठी माणसांच्या भेटीला आणत आहोत.
या गाण्याच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी एका अल्बम सॉंग साठी काम केले आहे,
त्यांच्या व्यस्त शेड्यूल मधून त्यांनी या गाण्यासाठी आम्हाला वेळ दिला,
त्यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव आम्हाला मार्गदर्शक ठरणारा आहे.
गाणे बघितल्यानंतर त्यांनी दिलेली कौतुकाची थाप ही कामाचे समाधान देणारी आणि भविष्यातील वाटचालीसाठी प्रेरणादायी आहे.

अजित पाटील एन्टरटेनमेंटने प्रोडक्शन ची धुरा सांभाळली आहे. तर मेकअप पल्लवी तावरे यांनी केले असून प्रसिद्धी सिद्धांत मीडिया अँड पब्लिसिटी यांची आहे.

Web Title :- Veteran actress Nishigandha Wad will be seen for the first time in the album song on the occasion of the song ‘Sawale Sundar Roop Manohar’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raj Kundra Arrested | अश्लिल चित्रपट प्रकाशित प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक

Uddhav Thackeray | कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांडुरंगाला साकडे

Porn apps Case | पॉर्न व्हिडीओ बनवून अपलोड केल्याप्रकरणी राज कुंद्रा आधी ‘या’ अभिनेत्रीला झाली होती अटक

Supreme Court | महाराष्ट्र सरकारला उपचाराचे दर ठरवण्याचा अधिकार नाही