ज्येष्ठ अभिनेत्री सराजे सुखटणकर यांचं वयाच्या 84 व्या वर्षी निधन

पोलीसनामा ऑनलाइन – ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत भूमिका साकारणाऱ्या जेष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे बुधवारी निधन झाले. त्यांनी विविध नाटकं, मालिका आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. त्या अविवाहित असून ८४ वर्षाच्या होत्या.

‘नर्तकी’ या सरोज सुखटणकर यांच्या गाजलेल्या नाटकाचे ३०० हुन अधिक प्रयोग झाले होते. तसेच त्यांना रुई (ता. हातकणंगले) येथे मूळ गावी नाटकांत अभिनय करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी व्यावसायिक नाटकासाठी महाराष्ट्रात दौरे केले. ५० हुन अधिक नाटकांत त्यांनी विविध भूमिका पार पाडल्या. ‘वादळवेल’ या नाटकातील त्यांची भूमिका विशेष गाजलेली.

सरोज यांनी मराठी चित्रपटात चरित्र अभिनेत्री म्हणून काम केले. ‘एकटा जीव सदाशिव’, ‘ज्योतिबाचा नवस’, ‘दे दणादण’, ‘लेक चालली सासरला’ अशा प्रसिद्ध चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. अलका कुबल यांच्यासोबत त्यांनी ‘धनगरवाडा’ हा शेवटचा चित्रपट केला. ‘अमृतवेल’ आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकांत त्यांनी काम केले. त्यांना महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागासह विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like