ज्येष्ठ अभिनेते स्वरुप दत्ता यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ज्येष्ठ बंगाली अभिनेते स्वरुप दत्ता वय (७८) यांचे आज (बुधवार) रुग्णालयात निधन झाले आहे. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. स्वरुप दत्ता यांना शनिवारी अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर त्यांच्या तब्बेतीमध्ये काही सुधारणा जाणवली नाही. त्यांनी आज (बुधवार) शेवटचा श्वास घेतला.

त्यांना सिटी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दाखल केल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते त्यांच्या तब्बेतीमध्ये सुधारणा झाली नाही त्यामुळे त्यांचे निधन झाले. अभिनेता स्वरुप दत्ता ६० आणि ७० दशकांमध्ये बंगाली चित्रपटांमध्ये काम केले होते.

स्वरुप दत्ता यांचा जन्म २२ जून १९४१ मध्ये याहुआमध्ये झाला. त्यांनी बंगालमधून आपले शिक्षण पुर्ण केले. आपल्या स्कूल टाइमिंगमध्ये त्यांची चित्रपटात काम करण्याची खूप इच्छा होती. जेव्हा त्यांची मुलाखत प्रसिद्ध अभिनेता उत्पल दत्त यांच्यासोबत झाली तेव्हा तपन सिन्हाचा चित्रपट ‘अपंजन’ मधून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली.

अभिनेता स्वरुप दत्ता यांच्या परिवारामध्ये त्यांची पत्नी आणि एक मुलगा आहे. १९६०-७० दशकामध्ये बंगाली चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखविणारे स्वरुप दत्त यांचा मुलगा शरण दत्त ही अभिनेता आहे. स्वरुप यांच्या निधनामुळे त्यांचा परिवार आणि बंगाली चित्रपटसृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

स्वरूप दत्त यांच्या निधनाची बातमी कळताच सुदिप्ता चक्रवर्तीने ट्विट केले की, या महान व्यक्तीच्या निधनामुळे बंगाली सिनेमाच्या जगात दुःख पसरले आहे.

दुखणे कमी करण्यासाठी औषधांशिवाय ‘हे’ उपायदेखील लाभदायक

सुगंधाने सुधारेल आरोग्य, एरोमॅटिक थेरपी करून पाहा

 ‘हे’ २२ सोपे घरगुती उपाय केल्यास त्वरित उजळेल चेहरा

‘किडनी’ फेल्युअर होऊ नये म्हणून करा ‘या’ उपाययोजना

‘अंडरआर्म डार्कनेस’ दूर करण्याचे ९ घरगुती रामबाण उपाय

 तजेलदार त्त्वचेसाठी ‘टोमॅटो’ उपयोगी, जाणून घ्या सामान्य गोष्टींचे ‘खास गुण’

‘या’ ५ सवयी लावून घ्या, तुम्ही वारंवार पडणार नाहीत आजारी

भाज्यांच्या सालीमध्ये सुद्धा असतात औषधी गुण, करा ‘हे’ उपाय

Loading...
You might also like