गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी दोन कंपन्यांमध्ये वाढवली भागीदारी, टाटा मोटर्सचे खरेदी केले 1.29% शेयर्स

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी टाटा मोटर्समध्ये मोठी भागीदारी खरेदी केली आहे, तसेच त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी वॉटर ट्रीटमेंट कंपनी वीए टेक वाबागच्या शेयरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. आकड्यांनुसार, सप्टेंबर 2020 तिमाहीच्या अखेरपर्यंत राकेश झुनझुनवाला यांनी टाटा मोटर्सची 1.29 टक्के भागीदारी खरेदी केली आहे. यासोबतच ते कंपनीचे सर्वात मोठे मायनॉरिटी शेयर होल्डर्सपैकी एक झाले आहेत.

सप्टेंबर तिमाहीत विकले टायटनचे काही शेयर

राकेश झुनझुनवाला यांचे नाव जून 2020 तिमाहीपर्यंत टाटा मोटर्सच्या प्रमुख शेयरधारकांच्या यादीत सहभागी नव्हते. टाटा मोटर्सने डिस्क्लोजरमध्ये राकेश झुनझुनवाला यांच्याकडून शेयर खरेदी करण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यांनी टाटा ग्रुपची कंपनी टायटनसह अनेक कंपन्याचे शेयर्स खरेदी केले आहेत. सप्टेंबर तिमाहीत झुनझुनवाला यांनी टायटनचे शेयर विकले आणि अ‍ॅग्रो टेक फूड्स, टाटा मोटर्स आणि ल्यूपिन लॅब्जचे शेयर खरेदी केले. त्यांच्या शेयर पोर्टफोलियोमध्ये अन्य शेयरशिवाय जियोजित फाइनान्शियल सर्व्हिसेस, क्रिसिल, अनंत राज लिमिटेड, फार्स्टसोर्स सोल्यूशन्स, फोर्टिस हेल्थकेयर, ओरिएंट सीमेंट आणि मान इंफ्राचा सहभाग आहे.

वीए टेक वाबागमध्ये रेखा झुनझुनवालांची 8.05 टक्के भागदारी

सप्टेंबर 2020 ला संपलेल्या तिमाहीत वॉटर ट्रीटमेंट कंपनी वीए टेकमध्ये रेखा झुनझुनवालांची भागीदारी 8.04 टक्के झाली आहे. कंपनीने सांगितले की, त्यांनी प्रिफ्रेन्शियल शेयर इश्यूद्वारे रेखा झुनझुनवालांसह खास गुंतवणुकदारांकडून 120 कोटी रुपये जमावले आहेत. कंपनीचा शेयर शुक्रवारी 191 रुपयांच्या कक्षेत चालत होता, जो एप्रिल 2020 मध्ये 73 रुपयांच्या खालच्या स्तरावर होता. तर, टाटा मोटर्सचा शेयर शुक्रवारी 136 रुपयांच्या जवळपास चालत होता. यापूर्वी मार्च 2020 मध्ये याचा खालचा स्तर 63.60 रुपयांपर्यंत पोहचला होता.

ऑटो सेक्टरमध्ये तेजीची शक्यता

एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेसने म्हटले की, फेस्टिव्ह सीझनमुळे ऑटो सेक्टरमध्ये तेजी येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यापूर्वी ऑगस्ट-सप्टेंबर 2020च्या दरम्यान ऑटो सेक्टरच्या प्रत्येक सेगमेंटमध्ये तेजी दिसली आहे. यामुळे अपेक्षा आहे की, ऑटो सेक्टर लॉकडाऊन दरम्यान आलेल्या जबरदस्त घसरणीतून उभे राहात लवकर वेग पकडेल. यामध्ये फेस्टिव्ह सीझनच्या दरम्यान होणार्‍या खरेदीची महत्वाची भूमिका राहील. राकेश झुनझुनवाला यांच्याकडे 34 कंपन्यांचे शेयर आहेत. त्यांच्या शेयरची व्हॅल्यू सुमारे 18,804.6 कोटी रूपये आहे.