संत साहित्याचे अभ्यासक डॉ. यशवंत पाठक यांचे निधन

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – जेष्ठ साहित्यिक आणि संत साहित्याचे थोर अभ्यासक डॉ. यशवंत पाठक (वय ७२) यांचे आज पहाटे निधन झाले.  कीर्तनकार गौतमबुवा पाठक यांच्या संस्करामुळे ते कीर्तन करीत. संत ज्ञानेश्वर यांच्यावर त्यांचा गाढा अभ्यास होता. मनमाड येथील महात्मा गांधी महाविद्यालयात त्यांनी अध्यापन केले. पुणे विद्यापीठातही विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले. संत साहित्यावर त्यांनी महाराष्ट्रभर रसास्वादी व्याख्याने दिली. त्यांच्या अनेक पुस्तकांना शासनाचे व मान्यवर संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत.

यशवंत पाठक यांची मौलिक ग्रंथसंपदा

 

चंद्राचा एकांत
आनंदाचे आवार
कीर्तन प्रयोग
पहाट सरी
चंदनाची पाखर
येणे बोधे आम्हा असो सर्व काळ
संचिताची गोजागिरी
ब्रम्हगिरीची सावली
नाचू कीर्तनाचे रंगी
मोह मैत्रीचा
अंगणातले आभाळ
आभाळाचं अनुष्ठान
मनाच्या श्लोकाचे ‘मर्म’