प्रख्यात प्लास्टिक सर्जन डॉ. देबराज शोम ‘सर्वोत्तम संशोधक’ पुरस्काराने सन्मानित

मुंबई | पोलीसनामा आॅनलाइन – ‘इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ सायंटिफिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ (आयओएसआरडी)  या संस्थेतर्फे आयोजित अभियांत्रिकी विज्ञान आणि व्यवस्थापन या विभागातील आंतरराष्ट्रीय संशोधन पुरस्कार सोहळ्यात मुंबईतील ‘द एस्थेटिक क्लिनिक्स’चे संचालक डॉक्टर देबराज शोम यांना ‘सर्वोत्तम संशोधक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. शोम यांना त्यांच्या क्यूआर ६७८ या क्रांतिकारी हेअर ग्रोथ फॅक्टर फॉर्म्युलेशन (केसांची वाढ करणारा फॉर्म्युला) या शोधासाठी सन्मानित करण्यात आले. युनायटेड स्टेट्स पेटंट अँड ट्रेडमार्क ऑफिसतर्फे (यूएसपीटीओ) या फॉर्म्युलाला पेटंट प्राप्त झाले आहे आणि हा फॉर्म्युला आता जगभरात व्यावसायिक पातळीवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

विजय मल्ल्याला ठेवण्यासाठी तिहार जेल सुरक्षित ? 

हा शोध पूर्णपणे ‘मेड इन इंडिया’ अर्थात भारतात तयार करण्यात आला आहे आणि केस प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी हा एक पर्याय आहे.  मेसोथेरपी या तंत्राचा वापर करून क्यूआर ६७८ स्काल्पच्या त्वचेमध्ये इंजेक्ट करण्यात येते. हे संयुग केसांच्या फॉलिकल्सवर काम करते आणि केसांची पुन्हा वाढ होईल याची खातरजमा करते. ही उपचार पद्धती नॉन सर्जिकल आहे आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलमधील ८० टक्के रुग्णांवर याचे उत्तम परिणाम पाहायला मिळाले आहेत. या रुग्णांमध्ये केमोथेरपीमुळे केसगळती झालेल्या कर्करुग्णांचाही समावेश होता.

डॉक्टर शोम यांनी अनेक गुंतागुंतीच्या प्लास्टिक सर्जिकल प्रक्रिया हाताळल्या आहेत. त्यामुळे ते जागतिक पातळीवरील एक अग्रणी प्लास्टिक सर्जन म्हणून त्यांना मानाचे स्थान आहे. फेशियल कॉस्मेटिक आणि रीकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी, फेशियल ऑक्युलर ऑन्कॉलॉजी, ऑक्युलोप्लास्टिक, आयलिड आणि ऑर्बिटल सर्जरी या शस्त्रक्रियांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रीचकँडी हॉस्पिटल आणि अपोलो हॉस्पिटल्ससारख्या मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलशी ते संलग्न आहेत. अद्ययावत संशोधन करण्यात ते अग्रभागी असतात आणि त्यांचे शोधप्रबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रकाशनांमध्ये प्रकाशित झाले आहेत. मुंबई, हैदराबाद, दिल्ली, कोलकाता आणि अमृतसर येथे ‘एस्थेटिक क्लिनिक्स’ची केंद्रे आहेत.