Jayant Pawar | ज्येष्ट नाटककार जयंत पवार यांचे निधन

मुंबई : Jayant Pawar | ज्येष्ठ नाटककार आणि पत्रकार जयंत पवार यांचे (Jayant Pawar) आज निधन झाले. ते 61 वर्षांचे होते. पवार यांना रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

जयंत पवार यांना रविवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी पत्रकार, लेखिका संध्या नरे व मुलगी असा परिवार आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतलेल्या स्पर्धेत ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकासाठी जयंत पवार यांना सर्वोत्कृष्ठ लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले होते. जानेवारी 2014 मध्ये  महाड येथे झालेल्या 15 व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहासाठी 2012 चा साहित्या अकादमी पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.

जयंत पवार यांची साहित्य संपदा

नाटक :

अंधातर, काय डेंजर वारा सुटलाय

टेंनशेच्या स्वप्नात ट्रेन

दरवेशी

पाऊलखुणा

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर

बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक

माझे घर

वंश

शेवटच्या बीभस्ताचे गाणे

होड्या

हे देखील वाचा

Pune Crime | आईला मारहाण प्रकरणात 3 मुलांसह इतरांना जामीन

Pune News | पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी पळाला

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  veteran playwright jayant pawar passes away

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update