बायको माहेरी गेली म्हणून नवऱ्याचा वीरू स्टाईल राडा 

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – बिकामाचा नवरा, जावयाची जात, नवरा माझा नवसाचा, कुंकू झालं वैरी यासारख्या चित्रपटातून नवऱ्याची अनेक रूपे तुम्ही पहिली असतील परंतु बायको भांडणे करून माहेरी गेली म्हणून पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करणारा नवरा तुम्ही बघितला नसेल. परंतु हा किस्सा खरोखर घडला आहे. भुसावळ शहरात असा एक वीरू आपल्या बायकोच्या विरहात वेडा झाला आणि माहेरी गेलेली बायको माघारी येत नाही येत नाही तोपर्यंत आपण पाण्याच्या टाकी वरून खाली उतरणार नाही असा पवित्रा या विरुने घेतला शेवटी पोलिसांनी याला कसा बसा खाली उतरवला आणि बघ्यांची गर्दी दूर झाली.

मनोज शुक्ला असे या वीरुचं नाव असून त्याची पत्नी त्याच्याशी भांडणे करून माहेरी निघून गेली आहे. पत्नी माहेरी निघून गेल्यामुळे त्याला खूप नैराश्य आले आणि त्याने हा सर्व प्रकार केला असल्याचे पोलिसांनी दिलेल्या माहिती वरून स्पष्ट झाले आहे. भुसावळ शहरात लिम्पस क्लब परिसरात ही घटना असून मनोज शुक्ला त्याच परिसरात राहतो. बायको माहेरी गेली या नैराश्यातून त्याने जवळच्या १०० मीटर उंच पाण्याच्या टाकीवर चढून वीरू स्टाईल राडा सुरु केला   त्यांनतर त्या ठिकणी जमलेल्या लोकांनी पोलिसांना पाचारण केले पोलिसांनी त्या व्यक्तीला समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो खाली उतरला पण आज दिवसभर भुसावळ मध्ये त्या वीरूचीच चर्चा सर्वत्र आहे.

मनोज शुक्ला या तरुणाचा तीन वर्षांपूर्वी प्रेम विवाह झाला होता. त्यांच्या पत्नी सोबत त्याची सारखी भांडणे होत होती या बाबीला कंटाळून ती त्याला सोडून माहेरी निघून गेली आणि जाताना म्हणाली कि मी या पुढे तुझ्या घरी कधीच येणार नाही. या भांडणानंतर मनोज प्रचंड तणावाखाली गेला आणि त्याने टाकीवर चढून हा राडा केला.

मनोज काल त्याच्या सासरवाडीला गेला होता.  बायकोला विनवणी करण्याचा प्रयत्न केला परंतु काही केल्या बायको ऐकली नाही.  तिथं हि तिने घरातून निघून जाताना बोलेले वाक्यच ती बोलली मी सासरी येणार नाही म्हणून तेथून येताना मनोजच्या टोक्यात नाहक विचार येऊ लागले. घराजवळ आल्यावर तो पाण्याच्या टाकीवर चढला आणि त्यानंतर सर्व प्रकार घडला. शेवटी पोलिसांनी त्याला सांगितले कि  त्याच्या बायकोशी बोलणी करण्यास महिला दक्षता समितीच्या महिला  पाठवतो. तेव्हा तो वीरू खाली उतरला. त्याचा जीव वाचवण्यासाठी पोलिसांना मात्र मोठी कसरत करावी लागली.