राममंदिर निर्माणासाठी शिवसेनेने आतापर्यंत काय केले : विश्व हिंदू परिषद

इंदूर : वृत्तसंस्था – राममंदिराच्या मुद्द्यावर अयोध्येला जाणाऱ्या शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना विश्व हिंदू परिषद म्हणजेच्या व्हीएचपीने एक सल्ला दिला आहे. राममंदिराच्या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारचे राजकारण न करण्याचा सल्ला त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत समावेश असलेल्या शिवसेनेने राम मंदिराच्या मुद्द्यावर राजकारण न करता भाजपला धोरणात्मक मार्ग सूचवावा, असा सल्ला दिला आहे.

यासंदर्भात बोलताना विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विष्णू सदाशिव कोकजे म्हणाले, या मुद्द्यावर केल्या जाणाऱ्या राजकारणाशी आमचा काहीही संबंध नाही. मात्र यावर कुणीही राजकारण करू नये, कारण हा हिंदूंच्या आस्थेचा विषय आहे, असेदेखील ते म्हणाले. यावेळी राम मंदिराच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांना सल्ला देताना ते म्हणाले कि, शिवसेनेने केंद्र सरकारला वाद मिटवण्यासाठी धोरणात्मक सूचना देणे आवश्यक आहे. जेणेकरून राम मंदिराला घटनात्मक दर्जा प्राप्त होऊन भव्य राम मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा होईल. त्याचबरोबर फक्त दौरे करून काही होणार नाही तर राममंदिर निर्माणासाठी शिवसेनेने आतापर्यंत काय केले असा सवाल देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला.

दरम्यान, उद्धव ठाकरे आपल्या १८ खासदारांना घेऊन अयोध्येला जाणार अशी घोषणा झाल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावर टीका करत म्हटले होते कि, उद्धव ठाकरे दहावेळा जरी अयोध्येला गेले तरी राम मंदिर उभे राहणार नाही. त्यामुळे आता विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विष्णू सदाशिव कोकजे यांच्या या सल्ल्यावर उद्धव ठाकरे काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

इरेक्शनची समस्या अशी सोडवा, घ्या शरीरसुखाचा आनंद

पुरुषांनी शुक्राणू वाढीसाठी करावेत ‘हे’ रामबाण उपाय

दिवसभरात ३ कपांपेक्षा जास्त चहा पिऊ नका, ‘हे’ होतील दुष्परिणाम

‘हे’ पदार्थ चुकूनही ठेवू नका तांब्याच्या भांड्यात, ठरू शकतात विषारी