हिंदुत्वाला वाचविण्यासाठी CAA आणलं, यामध्ये चूकीचं काय ? : विश्व हिंदू परिषद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय संयुक्त महासचिव राघवुलु यांनी सांगितले की नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) हिंदुत्व वाचवण्यासाठी आणण्यात आला आहे. ते रविवारी म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सरकारने शरणार्थींना नागरिकत्व देण्यासाठी आणण्यात आलेल्या सीएए कायद्यात काहीही गैर नाही. सीएएला हिंदूत्वाच्या रक्षणासाठी आणण्यात आले आहे. अजूनही सरकारने नागरिकत्व कायद्यात काहीही संशोधन केलेले नव्हते, यात काय चूकीचे आहे?

विहिंपचे तेलंगणा अध्यक्ष एम. राजारामू यांनी सांगितले की सीएएच्या विरोधात फक्त अल्पसंख्यांक समुदाय आंदोलन करत आहेत. नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेशमधील हिंदू, ईसाई, शिख, बौद्ध आणि पारसी शरणार्थी ज्यांनी 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात प्रवेश केला होता त्यांना नागरिकत्व प्रदान करतो.

याआधी पंतप्रधान मोदींनी तुमकूरमध्ये काँग्रेससह सर्व विरोधी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांनी काँग्रेसवर आरोप लावला होता की ते पाकिस्तानातून आलेल्या हिंदू शरणार्थींचा विरोध करत आहेत.

पंतप्रधानांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याची माहिती देताना सांगितले की आम्ही धार्मिक अल्पसंख्यांकांना नागरिकत्व देण्याचे काम करत आहोत तर काँग्रेस त्यांच्या विरोधात आंदोलन काढत आहे. ते म्हणाले की 2014 नंतर सामान्य लोकांच्या जीवनात सार्थक परिवर्तन आणण्याचा अभूतपूर्व प्रयत्न सुरु झाला.

सीएए संबंधित बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की पाकिस्तानची निर्मिती धर्माच्या आधारे झाली होती. तेथे धार्मिक अल्पसंख्यांकांना त्रास दिला जातो. त्यामुळे लोक शरणार्थी म्हणून भारतात येण्यास तयार होतात. परंतु काँग्रेस आणि त्यांची सहकारी पक्ष पाकच्या विरोधात काहीही न बोलता उलट या शरणार्थींच्या विरोधात आंदोलने करत आहेत. आता प्रत्येक भारताचा हा मानस बनला आहे की आम्हाला परंपरागत ज्या समस्या मिळल्या ते सोडवल्या पाहिजेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/