बलात्कार, दहशतवाद, नक्षलवाद नेहरू खानदानाची देण : साध्वी प्राची

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या वादग्रस्त वक्त्यव्यांमुळे चर्चेत असलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. साध्वी प्राची यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर टीका करताना म्हटले आहे की नक्षलवाद, दहशतवाद, बलात्कार ही सर्व नेहरू खानदानाची देणगी आहे. मेरठ येथे एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले आहे .

देशात नुकत्याच झालेल्या बलात्काराच्या घटनांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना राहुल गांधी म्हणाले होते की बलात्काराची राजधानी म्हणून भारत विकसित होत आहे. राहुल गांधींच्या या विधानानंतर साध्वी प्राची यांनी आता वादग्रस्त विधान केले आहे. त्या म्हणाल्या की , ‘नक्षलवाद, दहशतवाद, बलात्कार हे सर्व नेहरूंच्या कुटुंबामुळे झाले आहेत. ही नेहरू खानदानाची देण आहे .’

अखिलेश बलात्काऱ्यांना वाचवतात
साध्वी प्राची यांनीही समाजवादी पक्षाचे अध्यक्ष व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावरही टीका केली. प्राची म्हणाल्या की अखिलेश सत्तेत असताना बलात्काऱ्यांना वाचवत होते आणि विरोधात असताना आंदोलनाला बसतात. शनिवारी उन्नाव बलात्कार प्रकरणी अखिलेश यादव विधानसभेबाहेर आंदोलन केले होते.

हैदराबाद एन्काऊंटरची प्रशंसा
हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील चार आरोपींच्या एन्काऊंटरबद्दल साध्वी प्राची यांनी हैदराबाद पोलिसांचे कौतुक केले. हैदराबाद पोलिसांकडून धडा घेत उन्नाव प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी अशीच कारवाई केली पाहिजे होती असे त्या म्हणाल्या. तसेच उन्नावच्या दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Visit : Policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like