मंदिर उभारणीपूर्वीच ‘विहिंप’चा मोठा ‘कार्यक्रम’, 2.75 लाख गावात लावणार प्रभु श्रीरामाची ‘प्रतिमा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्यात राम मंदिर निर्माणाआधीच विश्व हिंदू परिषदेने एका मोठ्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. विश्व हिंदू परिषद देशात 2.75 लाख गावात प्रभू रामाची प्रतिमा लावणार आहेत. रामोत्सव नावाने सुरु होणारा हा कार्यक्रम 25 मार्चला सुरु होणार आहे आणि 8 एप्रिलला समाप्त होईल. 1989 मध्ये राम मंदिर आंदोलनादरम्यान याच गावातून मंदिर निर्माणासाठी विटा आणण्यात आल्या होत्या.

अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणासाठी विहिंप सक्रीय आहे आणि आता निर्माणापूर्वी त्यांनी एका मोठ्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. विहिंपचे लक्ष राम मंदिरातील पुजारींवर आहे. ते मंदिरासाठी दलित पुजारीच असावे अशी मागणी करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की दलित पुजारी नियुक्त केल्याने समाजात समतेचा संदेश जाईल. विहिंपचे हे देखील म्हणणे आहे की मंदिराची निर्मिती सरकारकडून नाही तर समाजाच्या पैशातून होईल.

सरकार अ‍ॅक्शनमध्ये –
राम मंदिर निर्माणासाठी सरकार अ‍ॅक्शनमध्ये आले आहे. सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयानंतर दोन महिन्यानंतर मोदी सरकारने यासंबंधित सर्व प्रकरणं पाहता एक वेगळा डेस्क तयार करण्यात आला आहे. याची अध्यक्षता अतिरिक्त सचिव स्तराचे अधिकारी करतील. गृहमंत्रालयाने गुरुवारी सांगितले की अयोध्या प्रकरणी आणि न्यायालयाच्या निर्णयासंबंधित प्रकरण तीन अधिकारी पाहतील. याचे नेतृत्व अतिरिक्त सचिव करतील.

ट्रस्ट तयार करण्याची सरकारकडून तयारी –
अयोध्येच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार केंद्र सरकारला राम मंदिर निर्माणासाठी ट्रस्ट बनवायची आहे. सरकार सध्या यावर काम करत आहे. सर्वोच्च न्यायालयानुसार तीन महिने म्हणजेच 9 फेब्रुवारीपर्यंत केंद्र सरकारला राम मंदिर निर्माण ट्रस्ट तयार करायची आहे.

पहिली वीट दलिताच्या हाताने ठेवण्यात येईल –
विहिंपचे प्रवक्ता विनोद बंसल यांनी सांगितले की ट्रस्टचे काम सरकारला करावे लागेल. यात आमचा हस्तक्षेप नसेल. दर दलित पुजारीची नियुक्ती होईल तर स्वागत आहे. विहिपची बऱ्याच काळापासून मागणी आहे की दलित पुजारीची नियुक्ती व्हावी. विहिपकडून अनुसूचित वर्गाच्या बांधवाना पूजा पाठ करण्यासाठी प्रशिक्षण देऊन पुजारी बनवण्याचे अभियान चालवले जात आहे.

राम मंदिर आंदोलनात दलितांना जोडण्यासाठी संघ आणि विहिंप पहिल्यापासून सक्रिय आहेत. 9 नोव्हेंबर 1989 मध्ये जेव्हा राम मंदिराचा शिलान्यास ठेवण्यात आला होता. ही विट दलित कार्यकर्ता कामेश्वर चौपाल यांच्या हातून ठेवण्यात आली होती. यामाध्यमातून राम मंदिर आंदोलनाच्या मागे संपूर्ण हिंदू समाज उभे असल्याचा संदेश दिला.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/