VI चा जबरदस्त प्लॅन ! अनलिमिटेड कॉल आणि भरघोस डेटा; जिओ, एअरटेलही होतंय फेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जिओची एन्ट्री झाल्यानंतर टेलिकॉम क्षेत्रातील स्पर्धा तीव्र झाली. यात व्होडाफोन-आयडिया यांनी एकत्रित करार करून एकच कंपनी थाटली. त्यामुळे या स्पर्धेत भर पडली. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक कंपनीकडून किफायतशीर प्लॅन आणले जाताहेत. कमी किमतीच्या प्लॅनमध्ये अधिकाधिक सुविधा देण्याचा कंपन्या प्रयत्न करीत आहे. अशातच VI ने ४४९ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन आणलाय.

VI च्या ४४९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये ५६ दिवसांची वैधता मिळत आहे. तसेच VI कडून प्रतिदिन ४ जीबी डेटा दिला जात आहे. एवढेच नाही, तर अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस, झी ५ अॅप आणि व्होडाफोन प्लेचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत देण्यात येत आहे.

Jio चा विचार केल्यास, कंपनीकडून ४४४ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन ऑफर केला जातोय. मात्र, जिओकडून केवळ २ जीबी डेटा प्रतिदिन दिला जात आहे. अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि जिओ अॅपचे सबस्क्रिप्शन मिळत आहे. जिओच्या या प्लॅनची वैधता ५६ दिवसांची आहे.

Airtel कडून ४४९ रुपये किमतीचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन ऑफर केला जाते. एअरटेलकडूनही दररोज २ जीबी डेटा दिला जात आहे. यासह अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि अॅमेझॉन प्राईमचे ३० दिवसांसाठी मोबाइल एडिशन फ्री ट्रायल, फ्री हेलोट्यून्स, एअरटेल एक्स्ट्रिम प्रीमियम, विंक म्यूझिक फ्री, फ्री ऑनलाइन कोर्स, तसेच फास्टॅगवर १०० रुपयांचा कॅशबॅक मिळतोय.

एकंदरीत या तिन्ही प्लॅनचा तुलनात्मक आढावा घेतल्यास तिन्ही कंपन्यांच्या प्लॅनची किंमत जवळपास सारखी आहे. परंतु, यात VI च्या प्लॅनमध्ये रोज ४ जीबी डेटा मिळत आहे. तर Jio आणि Airtel प्लानमध्ये रोज २ जीबी डेटाद देत आहेत. मात्र, अन्य सुविधांच्या बाबतीत एअरटेल पुढे आहे, असे दिसून येत आहे.