Vi ग्राहकांना धक्का ! 15 जानेवारीपासून 3G सेवा ‘या’ शहरात होणार बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्होडाफोन आणि आयडिया म्हणजेच Vi ने देशाची राजधानी दिल्लीत 15 जानेवारी 2021 पासून 3G सीम सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. Vi युझर्ससाठी ही बॅड न्यूज असल्याचे म्हटले जात आहे. 3 सीमकार्ड धारकांनी आपले सीम तातडीने 4G मध्ये परिवर्तित करून घ्यावेत, असे सांगितले जात आहे. यापूर्वी Vi ने मुंबई आणि बेंगळुरू या दोन शहरात आपली 3 जी सीम सेवा बंद केली असून, आता राजधानी दिल्लीत या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

व्होडाफोन-आयडिया 15 जानेवारी 2021 पासून दिल्लीतील 3 जी सीम सर्व्हिस बंद करणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे. Vi ने आपल्या निर्णयाबद्दल संबंधित सर्व ग्राहकांना दूरध्वनी किंवा संदेशाद्वारे माहिती द्यायला सुरुवात केली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) माहितीनुसार, दिल्ली सर्कलमध्ये Vi चे 1 कोटी 62 लाखाहून अधिक ग्राहक आहेत. यापैकी 3 जी सीम धारकांना 15 जानेवारीपर्यंत आपले सीम 4 जी परिवर्तित करावे लागणार आहेत.

देशात गेल्या अनेक वर्षापासून 4 जी सेवा सुरु आहे. 4 जी सेवेमुळे ग्राहकांना चांगला स्पीड मिळत आहे. रिलायन्स जिओच्या प्रवेशानंतर 4 जी आणि मोबाइल सेवेत मोठी क्रांती घडून आली आहे. यामुळे संपर्क सेवा पुरवण्याऱ्या कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा निर्माण झाली असून, याचमुळे व्होडाफोन आणि आयडिया एकत्र आले आहेत. मात्र आता Vi ने आपले 3 जी सीम सेवा बंद करत आहेत.