Samsung इलेक्ट्रॉनिक्सचे व्हाइस चेयरमन जे वाय ली यांना अडीच वर्षांची शिक्षा, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स (Samsung Electronics) चे 52 वर्षांचे व्हाइस चेयरमन जे वाय ली (Jay Y. Lee) यांना दक्षिण कोरियाच्या एका न्यायालयाने घुसखोरीच्या प्रकरणात अडीच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याचसोबत कंपनीची लीडरशीप आणि मोठ्या उद्योगाबाबत दक्षिण कोरियाच्या दृष्टीने सुद्धा बदल झाला आहे. आता जे वाय ली सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सच्या महत्वाच्या निर्णयांमध्ये सहभागी होणार नाहीत. या बैठकांमध्ये प्रतिस्पर्धी कंपन्यांना मागे टाकणे आणि कंपनी सांभाळण्याशी संबंधीत धोरणावर निर्णय होतात. कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी या बैठका महत्वाच्या असतात.

ली यांच्यावर माजी अध्यक्ष पार्क गॉन यांच्या एका सहकार्‍याला लाच देण्याचा आरोप आहे. या कारणामुळे ते 2017 मध्ये सुद्धा जेलमध्ये जाऊन आले आहेत. पुन्हा त्यांनी लाच दिल्याच्या आरोप नाकारात अपील केले. यानंतर त्यांची शिक्षा कमी करण्यात आली आणि ते एक वर्षानंतर जेलमधून बाहेर आले. यानंतर सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण सेऊल हायकोर्टमध्ये पाठवले. सेऊल हायकोर्टाने लाच घेण्यात दोषी ठरवले आणि अडीच वर्षांची शिक्षा सुनावली.

सुप्रीम कोर्टात करू शकतात अपील
साऊथ कोरियाच्या कायद्यानुसार, तीन वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वर्षाची शिक्षा रद्द होऊ शकते. जर कुणाला यापेक्षा मोठी शिक्षा असेल तर आपली शिक्षा पूर्ण करावी लागते. ली यांना झालेल्या अडीच वर्षाच्या शिक्षेतून त्यांचा डिटेंशनल सेंटरमध्ये राहिल्याचा कालावधी कमी केला जाऊ शकतो. शक्यता आहे की, सेऊल हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले जाईल. या प्रकरणात लीगल एक्सपर्टचे म्हणणे आहे की, सुप्रीम कोर्टाने अगोदरच या प्रकरणात निर्णय दिला आहे. अशावेळी आता हायकोर्टाच्या निर्णयात बदल होण्याची शक्यता कमी आहे.