जम्मू-काश्मीरच्या सरपंचांची उपराष्ट्रपतींनी घेतली भेट, अशांतता रोखण्यासाठी तात्पुरती बंधने लावल्याचे केलं स्पष्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी मंगळवारी सांगितले की, जम्मू-काश्मीरमधील विविध नागरी सुविधांवर लावलेला तात्पुरता निर्बंध हा अशांतता कमी करण्याच्या हेतूने होता आणि आता हळूहळू हे निर्बंध हटविले जात आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच निवडलेल्या सरपंचांशी झालेल्या बैठकीत नायडू म्हणाले की, स्थानिक प्रशासन विविध निर्बंध शिथिल करीत आहे आणि संवादाच्या सुविधा देखील टप्प्याटप्प्याने सुरू केल्या जात आहेत.

नायडू यांनी ट्विटरवर सरपंचांशी झालेल्या बैठकीची माहिती देताना सांगितले की, ‘आज मी जम्मू काश्मीरमधील सरपंचांच्या शिष्टमंडळास त्यांच्या निवासस्थानी भेटलो आणि घटनेचा कलम 370 काढून टाकल्यानंतर परिसरातील विकासकामे जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज आहेत.

राज्यातील पंचायती राज व्यवस्था बळकट करण्याबद्दल विश्वास व्यक्त करताना ते म्हणाले की जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्येही पंचायती संबंधित घटनेच्या 73 व्या आणि 74 व्या घटना दुरुस्तीच्या तरतुदी आपोआप लागू होतील.

जम्मू-काश्मीरमधील पंचायतीच्या निवडणूकीबद्दल आनंद व्यक्त करताना नायडू म्हणाले, जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दशकांनंतर राज्यपालांच्या शासनकाळात पंचायत निवडणुका यशस्वीरित्या पार पडल्या आणि पंचायतांना घटनात्मक हक्क देण्यात आले आहेत याचा मला आनंद आहे.

नायडू म्हणाले की पंचायतांना अधिकाधिक अधिकार देण्यात येत आहेत. पंचायतांना अर्थपूर्ण व कार्यक्षम करण्यासाठी त्या कार्यान्वयन करण्यासाठी पुरेसा निधी, कृती योजना, कर्मचारी व अधिकारी असणे आवश्यक आहे.

Loading...
You might also like