विचारमंथन परिवारानं सर्वसामान्यांना आधार दिला : प्रा. कृष्णा ताटे

इंदापूर : ज्याच्या अंगामध्ये नविन कौशल्य आहे,आणि तो स्वत कौशल्य विकसीत करून दुसर्‍याला ज्ञान देतो त्याला गुरू म्हणावे.आपल्या शिष्यामध्ये कोणत्या प्रकारचे गुण आहेत त्यावरून गुरू शिष्याला ज्ञान देण्याच कार्य करत असतात.

द्रोणाचार्यांनी भीम जाड होता म्हणून त्याला गदा शिकविली,अर्जुन लवचिक होता म्हणून त्याला धनुर्विद्या शिकविली यामध्ये या शिष्यांना शिकविणारे त्यांचे गुरू द्रोणाचार्य यांचेकडे त्याचे कौशल्य होते.ज्याच्या अंगामध्ये नविन कौशल्य आहे,आणि तो स्वत कौशल्य विकसीत करून दुसर्‍याला ज्ञान देतो त्याला गुरू म्हणावे.आपल्या शिष्यामध्ये कोणत्या प्रकारचे गुण आहेत त्यावरून गुरू शिष्याला ज्ञान देण्याच कार्य करत असतात.असेच कौशल्य इंदापूर विचार मंथन परिवाराचे प्रमुख अरविंद तात्या वाघ यांचेकडे असल्याने त्यांचेकडून गुरूंचा सन्मान होत आहे. अरविंदतात्या हे इंदापूर शहरातील सर्वसामाण्याला आधार देणारे नेतृृृृत्व असल्याचे मत प्रा. कृृृृष्णाजी ताटे यांनी इंदापूर येथे बोलताना व्यक्त केले.या वेळी अरविंद वाघ यांचा सन्मान इंदापूर विचार मंथन परीवाराच्या वतीने माण्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

इंदापूर विचारमंथन परीवार आयोजित गुरूजनांचा सन्मान सोहळा कार्यक्रमात प्रा.कृृृृष्णाजी ताटे बोलत होते.यावेळी माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे,शिवाजीराव मखरे बाळासाहेब सरवदे, दादा सोनवणे, विशाल चव्हाण, नितीन आरडे इत्यादी प्रमुख उपस्थित होते.यावेळी उत्तमराव मोरे,प्रा.कृृष्णा ताटे,प्रकाश सुर्यंवशी,दत्तात्रय दडस,शरद झोळ,सम्राट खेडकर,विरेंद्र गलांडे, अशोक मखरे,विनय थोरात,संदीपान कडवळे,सुहास मोरे, दत्तात्रय गवळी इत्यादी गुरूजणांचा इंदापूर विचारमंथन परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.तर जेष्ठ पत्रकार शैलेश काटे,सुरेश मीसाळ,सुधाकर बोराटे,धनंजय कळंबकर,विजय शिदे, देवा राखुंडे,दिपक खीलारे या पत्रकार बांधवाचाही सत्कार यावेळी करण्यात आला.

प्रा.ताटे सर पुढे बोलताना म्हणाले की व्यास पौर्णीमा व गुरूपौर्णीमेत व्यासाला अणूसरून गुरू मानला जातो.काही लोक ३ जानेवारी, ५ सप्टेंबरलाही गुरूपौर्णीमा मानतात, परंतु यामुळे गुरूचे महत्व कधीच कमी होत नाही. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्रकाश सुर्यवंशी सर म्हणाले की मानसाला ज्ञानाचा गर्व नसावा.ज्ञान हे दील्याने वाढते,शैक्षणीक क्षेत्रात फक्त ज्ञान द्यायचे या मताचा मी नाही.तर तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये गुरू म्हणून पाहील जात, एका विशिष्ट क्षेत्रामध्ये त्या माणसाची जडणघडण होताना जे पैलु त्याच्यापाशी असावे लागतात असे पैलु पाडणार्‍या माणसाला गुरू म्हणून पाहणे योग्य ठरेल असे मत प्रकाश सुर्यवंशी सर यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक बाळासाहेब सरवदे यांनी केले तर सुत्रसंचलन सुधाकर बोराटे यांनी केले.