कॅटरीनासोबत नाव जोडलेला आणि हरलीन सेठीचा एक्स बॉयफ्रेंड विक्की कौशल आता ‘हिला’ करतोय ‘डेट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ फेम अभिनेता विक्की कौशल सध्या प्रोफेशनल लाईफ एन्जॉय करत आहे. उरी चित्रपटाच्या यशानंतर त्याच्याकडे चित्रपटांची लाईन लागली. याच दरम्यान विक्की कौशलचे अभिनेत्री हरलीन सेठी हीच्यासोबत ब्रेकअप झाले. एवढेच नाही तर विक्की कौशलचे नाव अभिनेत्री कतरिना कैफ, हुमा कुरेशी, भूमि पेडनेकर यांच्याशी जोडले गेले होते.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, विक्की कौशल यामधील कोणत्याच अभिनेत्रीला डेट करत नाही. याउलट त्याचे मन एका अभिनेत्रीवर आले आहे. ही अभिनेत्री आहे मालविका मोहनन. ही अभिनेत्री २०१७ मध्ये प्रदर्शित झालेला माजिद मजीदी यांचा चित्रपट ‘बियॉन्ड द क्लाउड्स’ मध्ये दिसून आली होती.

मालविका मलयालम आणि कन्नड चित्रपटांचा प्रसिद्ध चेहरा आहे. तिला रजनीकांत स्टार चित्रपट ‘पेट्टा’ मध्ये पाहिले गेले होते. हा चित्रपट यावर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शित झाला होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, विक्की आणि मालविका दोघे सिंगल आहेत. दोघेही एकमेकांना डेट करण्यासाठी तयार आहेत.

विक्की कौशल, सनी कौशल, मालविका मोहनन आणि त्याचा भाऊ एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. चौघांमध्ये खुप छान कनेक्शन आहे. सध्या विक्की कौशल आणि मालविका यांच्यामध्ये जवळीक वाढत आहे. सनी आणि मालविका चांगले मित्र आहेत. दोघे आपल्या कामामध्ये कितीही व्यस्त असले तरी विक्की लंच किंवा डिनर मालविकासोबतच करतो.

विक्की कौशलला ‘उरी’ नंतर देशभक्तीवर असलेला ‘सॅम’ चित्रपटामध्ये नवा लुक घेऊन तो चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात विक्की मानेकशॉ यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटामध्ये १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धाच्या वेळी मानेकशॉची बहादुरी दाखविली जाणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करणार आहे.

मल्हार सेना आपणास महाराष्ट्रात फिरू देणार नाही : राष्ट्रवादी’च्या प्रदेशध्यक्षांना इशारा

मागास वर्गीय विद्यार्थ्यांचा भोजन व निवासाचा खर्च शासन उचलणार

‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर

अहो आश्चर्यम ! ‘वजन’ कमी करण्यासाठी रात्री फक्त ‘हे’ करा

अभिनेत्री कंगना बेघर होती तेव्हा ‘या’ अभिनेत्याने ३ महिने ‘सांभाळले’, वसुल केले १ कोटी

Loading...
You might also like