विकी-भूमि हाॅरर चित्रपटात एकत्र झळकणार

मुंबई : वृत्तसंस्था – विकी कौशलने आपल्या अभिनय कारकिर्दीत वेगवेगळ्या भूमिका साकारून खूप कमी काळात स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.‘मसान’, ‘राजी’, ‘संजू’ आणि अलीकडेच रिलीज झालेल्या ‘उरी’ चित्रपटातून त्याने प्रेक्षकांचे प्रेम मिळवले. ‘उरी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कलेक्शन केलं. या चित्रपटानंतर तो लवकरच एक हॉरर फिल्ममध्ये झळकणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, विकीने एक हॉरर चित्रपट साईन केला आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री भूमि पेडणेकर त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. विशेष म्हणजे भूमि आणि विकीची जोडी पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून किनाऱ्यावर उभ्या असणाऱ्या एका जहाजावर आधारित या चित्रपटाची कथा आहे.
भानुप्रताप सिंग या चित्रपटाचं दिग्दर्शिन करत असून निर्मिती करण जोहर करणार आहे. चित्रपटाचे शीर्षक आणि इतर माहिती अजूनही  गुलदस्त्यात आहे. मात्र चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. इतकंच नाही तर काही भाग चित्रीतही करण्यात आला आहे. हा चित्रपट विकी आणि भूमीच्या चित्रपट कारकिर्दीतला पहिला भयपट असणार आहे. भूमि पेडणेकरने आतापर्यंत ‘दम लगा के हईशा’, ‘टायलेट : एक प्रेम कथा’, ‘लस्ट स्टोरीज’, ‘शुभ मंगल सावधान’ यांसारख्या चित्रपटात अभिनय केला आहे.