Vicky Kaushal And Katrina Kaif | लवली कपल कतरिना व विकी हातात हात घालून एअरपोर्टवर स्पॉट

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडधील प्रसिद्ध व लोकप्रिय कपल म्हणजे अभिनेत्री कतरिना कैफ व अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal And Katrina Kaif) हे अनेकदा एकत्र टाईम स्पॅंड करताना दिसून येतात. कतरिना व विकी कौशल हे सोशल मीडियावरही सक्रीय असून अनेकदा ते तेथे देखील आपले प्रेम व्यक्त करत असतात. विकी व कतरिनाचा (Vicky And Katrina) मोठा चाहता वर्ग असून पापाराझी त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी मोठी गर्दी करतात. नुकतेच अभिनेता विकी कौशल व अभिनेत्री कतरिना कैफ (Vicky Kaushal And Katrina Kaif) यांना मुंबई एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले. यावेळी हे कपल कूल अंदाज मध्ये दिसून आले.

कतरिना व विकी यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ते दोघे वैवाहिक जीवनाचा आनंद घेत असून त्यांचे फोटो ते चाहत्यांसाठी शेअर करतात. नुकतेच ते एअरपोर्टवर स्पॉट झाले. यावेळी विकी कतरिनाचा हात हातात घेऊन चालत होता. हे कपल अगदी कॅज्युयल लूकमध्ये दिसून आले. यावेळी कतरिनाने फ्लॉलिंग टॉप व जीन्स परिधान (Katrina Kaif Fashion) केली होती व केस मोकळे सोडले होते. तर विकी कौशलने जॅकेट व ट्रॅक पॅंड घातली होती. या लवली कपलने पापराझींना हसत पोज देखील दिली.

अभिनेता विकी कौशल याचा ‘जरा हटके जरा बचके’ (Zara Hatke Zara Bachke) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. यामध्ये विकी व अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) यांची ऑन स्क्रीन जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. या चित्रपटाने 100 कोटींच्या घरात गल्ला कमावला. तो लवकरच डंकी (Dunki) या चित्रपटामध्ये झळकणार आहे. तसेच अभिनेत्री कतरिना कैफ ही शेवटची ‘भूत पोलीस’ (Bhoot Police) चित्रपटामध्ये दिसली होती. लवकरच तिचा ‘टायगर 3’ (Tiger 3) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कतरिना व सलमान (Salman Khan) पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना दिसणार असल्यामुळे चाहते उत्सुक आहेत. कतरिना कैफ व विकी कौशल (Vicky Kaushal And Katrina Kaif) यांनी 2021 साली लग्नगाठ बांधली.

Web Title : Vicky Kaushal And Katrina Kaif | katrina kaif and vicky kaushal spotted together at mumbai airport strike a pose for paparazzi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा