‘रणबीर’च्या ब्रेकअपच्या जखमेवर कॅटनं लावला ‘विकी’च्या प्रेमाचा ‘मलम’ ? मध्यरात्री एकत्र दिसले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कॅटरीना कैफचं रणबीर कपूर सोबत ब्रेकअप झाल्यानंतर डिप्रेशनमध्ये गेली होती. मोठ्या मुश्किलीनं ती यातून बाहेर आली आहे. या काळात तिला सलमान खानचीही खूप मदत झाली आहे. तिचं लक्ष हटवण्यासाठी सलमाननं तिला भारत सिनेमात कामही दिलं. आता कॅटला आपल्या ब्रेकअपच्या जखमेवर लावण्यासाठी प्रेमाच्या मलमाची गरज आहे. असंही म्हटलं जात आहे की अभिनेता विकी कौशल आणि कॅटचं झेंगाट सुरू आहे.

विकी कौशल आणि कॅटरीना कैफ अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. सध्या त्यांचा समोर आलेला नवा फोटो चर्चेत आहे. दोघांनाही रात्री उशीरा मित्राच्या डिनर पार्टीत एकत्र पाहण्यात आलं आहे. फोटो क्लिक करण्यापासून ते स्वत:चा बचाव करतानाही दिसले. ही पार्टी अली अब्बास जफरच्या वाढदिवसाची होती. मुंबईतील त्याच्या घरी या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.

एका फोटोग्राफरनं विकी आण कॅटचा फोटो शेअर केला आहे. इतकेच नाही तर यात कॅप्शन देताना असं म्हटलं आहे, “मिस्टर अँड मिसेस कौशल.”

विकी कौशलच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर विकी कॅटच्या आधी हरलीन सेठी सोबत नात्यात होता. या ब्रेकअपनंतर त्याचं नाव कॅटरीनासोबत जोडलं जाऊ लागलं.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like