‘भाईजान’ सलमान, ‘किंग’ खानला मागे टाकत विकी कौशल ठरला सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार विकी कौशलनं इतर बॉलिवूड अभिनेत्यांना मागे टाकत सर्वाधिक लोकिप्रिय बॉलिवूड अभिनेता होण्याचा मान मिळवला आहे. विकीनं स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या व्हायरल न्यूज श्रेणीत इतर अभिनेत्यांना मागे टाकत अव्वल स्थान प्राप्त केलं आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मीडियाटेक कपंनीनं याबाबत रिपोर्ट दिला आहे.

अलीकडे विकी भूत सिनेमात दिसला होता. गेल्या काही दिवसांपासून विकी आणि कॅटरीनाच्या नात्याबद्दल चर्चा सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो चर्चेत आहे. त्यामुळंच त्यानं अव्वल स्थान मिळवलं आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, व्हायरल न्यूज सेक्शनमध्ये विकीनं 100 गुण मिळवत लोकप्रियेतत प्रथम स्थान पटकावलं आहे.

व्हायरल न्यूज सेक्सनच्या दुसऱ्या यादीत विकीनंतर शाहिद कपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. शाहिद जास्त चर्चेत राहण्याचं कारण म्हणजे सिनेमाच्या सेटवर त्याचा झालेला अपघात, यानंतर पुन्हा शुटींग सुरू करणं, मीरा राजपूतचा साजरा केलेला वाढदिवस. अशा प्रकारे अनेकदा चर्चेचा हिस्सा राहिल्यानंतर शाहिद दुसऱ्या क्रमांकावर आहे.

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर जो अभिनेता आहे त्याचं नाव आहे कार्तिक आर्यन. कार्तिकनं 41 गुण मिळवत तिसरं स्थान मिळवलं आहे.

नुकताच बागी 3 मध्ये दिसलेला अभिनेता टायगर श्रॉफ यानंही 38 गुण मिळवत चौथा क्रमांक मिळवला आहे. 36 गुण मिळवत अजय पाचव्या क्रमांकावर आहे.