अभिनेता विकी कौशलच्या चेहऱ्याला दुखापत , पडले १३ टाके

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक ‘ या चित्रपटातून जनतेच्या मनात राज्य करणाऱ्या अभिनेता विकी कौशलचा एका चित्रपटाच्या शुटींग दरम्यान अपघात झाल्याची माहिती मिळते आहे. विकी कौशल सध्या दिग्दर्शक भानू प्रताप सिंह यांच्या आगामी थरारपटात मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे शुटींग सध्या गुजरात येथे सुरु आहे. याठिकाणी चित्रीकरण करतेवेळी कौशलचा इतका मोठा अपघात झाला की या अपघातात त्याच्या चीक बोन म्हणजेच गालाच्या हाडाला जोराचा मारा लागला असून त्याच्या गालाला १३ टाके पडले आहेत. त्यामुळे त्याच्या फॅन्ससाठी साहजिकच ही दुःखदायक बातमी आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान गुजरात येथील अलंग या शिपयार्डमध्ये एका स्टंट दृश्याचे चित्रीकरण करण्यात येत होते. यावेळी विकीला धावत जाऊन दरवाजा उघडायचा होता. मात्र तो दरवाजाच विकीच्या अंगावर पडला आणि त्याच्या चेहऱ्यावर जबर मार लागला त्याची तीव्रता इतकी जास्त होती की या अपघातात त्याच्या गालाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. या घटनेनंतर त्याला ताबडतोब रुग्णालयात हलवण्यात आले. त्याच्यावर उपाचर सुरु असल्याची माहिती मिळते आहे.

करण जोहर निर्मित या चित्रपटात विकीसोबतच भूमी पेडणेकरचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. विकीने २०१५ मध्ये ‘मसान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ‘राजी’, ‘संजू’ आणि ‘मनमर्जियाँ’मधील अभिनयामुळे त्याला ओळख मिळू लागली. तर ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर कमालच केली. या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर २०० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like