‘त्या’ चित्रपटाच्या ऑडिशन मध्ये विकी कौशलला करण्यात आले होते रिजेक्ट

मुंबई : वृत्तसंस्था – बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत की ज्यांना आपल्या संघर्षच्या काळात. चित्रपटातील भूमिकेसाठी दिलेल्या ऑडिशन मध्ये रिजेक्शनचा सामना करावा लागला आहे. त्यातीलच एक ताज उदाहरण आहे. विकी कौशल. विकी जरी आज सुपर स्टार बनला असेल पण त्यालाही कधीकाळीरिजेक्शनचा सामना करावा लागला होता. एका चित्रपटाच्या ऑडिशन मध्ये त्याला नकार मिळाला होता.

२०१३ मध्ये रिलीज झालेल्या फरहान अख्तरचा हिट चित्रपट ‘भाग मिल्खा भाग’ साठी विकीने ऑडिशन दिले होते. मात्र त्याला रिजेक्शनचा सामना करावा लागला होता. हा चित्रपट मिल्खा सिंग यांचा बायोपिक होता. आणि या चित्रपटाला प्रचंड यश मिळालं होत. एका मुलाखतीत विकी कौशलनेच याचा खुलासा केला आहे.

विकी कौशल ने ‘लव शव ते चिकन खुराना’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले परंतु त्याला खरी ओळख मिळाली ती मसान चित्रपटातून. पण त्याच्या चित्रपट करियरला खरी कलाटणी मिळाली ती ‘उरी’ चित्रपटाने. या सिनेमाला मिळालेल्या यशामुळे त्याला खरी प्रसिद्धी मिळाली. आणि त्याला घराघरात पोहचवले. विकी कौशलच्या ‘उरी’ चित्रपटाने ऑफिसवर बाहुबलीचे रेकॉर्ड मोडले आहे. आता पर्यंत उरीने १८८.५५ कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे.