Vicky Kaushal Instagram Post | विक्की कौशलच्या ‘मदर्स डे’ पोस्टनं वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष, पोस्ट पाहून नेटकरी झाले भावूक..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आज रविवार 8 मे रोजी सगळ्यांनी ‘मदर्स डे (Mother’s Day)’ धुमधडाक्यात साजरा केला. या दिवशी प्रत्येकजण आपल्या आईला खास वाटण्यासाठी कोणत्या प्रकारची कसर सोडत नाही. लोकांसोबतच कलाकार (Vicky Kaushal Instagram Post) सुद्धा सोशल मीडियावर आपल्या आईचे फोटो आणि आठवणी शेअर करत असतात. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विक्की कौशल (Vicky Kaushal Instagram Post) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) सुद्धा मागे नाही.

 

 

‘मदर्स डे’ च्या खास दिवसानिमित्त विक्की कौशलनं सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो (Vicky Kaushal Instagram Photos) शेअर केले आहेत. यामध्ये केवळ विक्की (Vicky Kaushal) त्याच्या आईसोबत नव्हे, तर कतरिनाच्या आईसोबत देखील दिसत आहे. विक्की कौशलनं लग्नाचे काही न पाहिलेले फोटो शेअर केले आहे. पहिल्या फोटोमध्ये विक्कीची आई मिरवणुकीमध्ये नाचताना दिसत आहे. तसेच तो आईच्या बाजूला नवरा झालेला उभा आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या फोटोमध्ये देखील त्यानं लग्नाचे काही फोटो शेअर केले आहे (Vicky Kaushal Instagram Post).

 

दुसऱ्या फोटोमध्ये त्याची आई (Vicky Kaushal Mother Pics) त्याच्यावर प्रेम करताना दिसत आहे. शेअर केलेल्या तिसऱ्या फोटोमध्ये विक्की सोबत त्याची पत्नी कतरिनाची आई दिसत आहे. फोटोमध्ये ते दोघं (Vicky Katrina Viral Photos) कतरिनाच्या आईच्या पायाला स्पर्श करताना दिसत आहे आणि त्या तिच्या दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देताना दिसत आहे.

 

दरम्यान, कतरिनानं देखील आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर (Katrina Kaif Instagram Post)
आई आणि सासु सोबतचा फोटो शेअर करून त्यांना ‘मदर्स डे’ च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Web Title :- Vicky Kaushal Instagram Post | vicky kaushal katrina kaif shares candid photos with their moms on mothers day

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा