Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding | लग्नानंतर चित्रपटांमध्ये नाही दिसणार कतरीना कैफ?, स्वतः कतरीनाने सांगितली ‘ही’ गोष्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding | बाॅलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ (Katrina Kaif) लवकरच म्हणजेच या महिन्यात विकी कैशलसोबत (Vicky Kaushal) लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा आहेत. एवढंच नाही तर दोघांच्या लग्न विधी देखील सुरु झाल्या आहेत. अशातच लग्नानंतर कतरीना चित्रपटांमध्ये काम करणार नसल्याचं समोर आलं आहे. (Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding)

 

कतरीनाने काही वर्षांपुर्वी एका मुलाखतीमध्ये याबाबत भाष्य केलं होतं. त्या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कतरीनाने ती लग्नानंतर काम करणार नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे कतरीना कैफ लग्नानंतर काम करेल की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding)

कतरीना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशलच्या संगीतमध्ये अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advaani) आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddhart Malhotra) स्पेशल डान्स पफाॅर्म (Dance Performance) करणार आहेत. या बातमी नंतर सर्वच जण या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सिद्धार्थ आणि कियारा दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सध्या तुफान रंगत आहे. तर काही महिन्यांपुर्वी कियाराने सिद्धार्थ आपला चांगला मित्र असल्याचं सांगितलं होतं. मात्र सिद्धार्थ आणि कियाराला अनेक वेळा एकत्र स्पाॅट करण्यात आलं आहे.

तसेच काही दिवसांपुर्वी अभिनेता सलमान खान त्याची खास मैत्रिण कतरीनाच्या लग्नात उपस्थित राहणार नसल्याचं समोर आलं आहे.
‘टायगर-3’ (Tiger-3) आणि ‘पठाण’ (Pathan) या दोन्ही चित्रपटांचे शूटिंग डिसेंबर महिन्यात सुरू करण्यात येणार आहे.
पठान चित्रपट मध्ये सलमान खान शाहरुख खान (Shahrukh Khan) सोबत दिसणार आहे. या चित्रपटाची शूटिंग ऑक्टोंबर महिन्यात होणार होती.
मात्र शाहरुख खानच्या खाजगी कारणांमुळे या चित्रपटाची शूटिंग पुढे ढकलण्यात आली असून ती डिसेंबरमध्ये सुरू करण्यात येणार आहे.
याच कारणामुळे सलमान खान कतरिना कैफच्या लग्नात उपस्थित राहणार नसल्याचं समोर आला आहे.

 

Web Title :- Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding | vicky kaushal katrina kaif wedding when actress said she could leave films if she have to priortise her marriage

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Earn Money | 20,000 रूपयात सुरू करा ‘या’ रोपांची शेती, सहज होईल 3.5 लाखाची कमाई, जाणून घ्या कशी?

Omicron Covid Variant | भारतात ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार झाल्याची शक्यता, ICMR ने व्यक्त केली भीती

Ajit Pawar | परराज्यातून येणाऱ्या लोकांसाठी RTPCR बंधनकारक; शाळांबाबतही अजित पवार म्हणाले…