कॅटरीना कैफला ‘डेट’ करण्याच्या प्रश्नावर विकी कौशलनं दिलं ‘हे’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राजी, संजू आणि उरी या सिनेमातून आपली वेगळी ओळख तयार करणारा अभिनेता विकी कौशल गेल्या काही दिवसांपासून कॅटरीना कैफसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. दोघांनीही यावर मौन बाळगले आहे. विकीला यबाबात विचारलं असता त्यानं सांगितलं की त्याला पर्सनल लाईफबद्दल सतर्कता ठेवायची आहे.

एका मुलाखतीत बोलताना त्याला कॅटसोबतच्या रिलेशनबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना विकी म्हणाला, “मला माझी पर्सनल लाईफ गार्ड करायची आहे. जर तुम्ही याबात काही बोलाल तर गोष्टी पसरतात. यामुळे गैरसमजही पसरतो. मला असं काहीही नको आहे. मी माझ्या पर्सनल लाईबद्दल थोडं सतर्क राहिलेलंच चांगलं आहे. मला सध्या यावर काहीही खुलून सांगण्याची इच्छा नाही.”

यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत विकी म्हणाला होता की, “मी जर काही खोटं बोललो तर ते लपवण्यासाठी मला आणखी खोटं बोलावं लागतं. जेव्हा ती गोष्ट मीडियात जाते आणि नंतर तुम्हाला जेव्हा त्याबद्दल कळतं तेव्हा एकदम बदलेलं व्हर्जन ऐकायला मिळतं. त्यानंतर पुन्हा तुम्हाला त्या वक्तव्याला घेऊन काहीतरी बोलावं लागतं. ही खूप थकवणारी प्रोसेस आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅटरीना कैफ आणि विकी कौशल रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघंही सध्या एकमेकांना वेळ देत आहेत.

विकीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर विकी कौशल लवकरच भूत सिनेमात दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे करण जोहरचा तख्त हा सिनेमाही आहे. याशिवाय तो उधम सिंह या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.

You might also like