Vicky Kaushal | विकीने शेअर केले कतरिनाच्या दर आठवड्याच्या मिटींगचे सिक्रेट

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडमधील सर्वांत रोमँटिक जोडी म्हणून लोकप्रिय असलेले अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ हे सध्या मॅरिड लाईफ एन्जॉय करत आहेत. या कपलचे (Kat-Vicky Couple) अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 9 डिसेंबरला त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं. दरम्यान विकीने (Vicky Kaushal) घरातील एक गंमतीदार प्रसंग सर्वांसोबत शेअर केला आहे.

Advt.

त्यांच्या घराबद्दल बोलताना विकी बोलला की, “सर्वात मजेदार गोष्ट म्हणजे जेव्हा कतरिना दर आठवड्याला स्टाफ मीटिंग घेते. ती संपूर्ण स्टाफला एकत्र बोलावते आणि घराच्या बजेटपासून इतर सर्व गोष्टींवर चर्चा करते. पैसे कसे आणि कुठे खर्च केले जातात याचा हिशेब ठेवते. जेव्हा ही चर्चा होते तेव्हा मला खूप मजा येते. मी पॉपकॉर्न खात या मीटिंगचा आनंद घेत असतो.”

विकीने (Vicky Kaushal) सांगितलेल्या या गोष्टींवरुन हे लक्षात येते की, लग्नानंतर कतरिना ही घर आणि काम दोन्ही व्यवस्थितरित्या सांभाळत आहे. एक गृहिणी तसेच अभिनेत्री अशा दुहेरी भूमिका कतरिना खऱ्या आयुष्यात निभावताना दिसत आहे. मध्यंतरी कतरिना घरातील साफसफाई करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

विकी कौशलचा (Vicky Kaushal) नुकताच ‘जरा हटके जरा बचके’ (Jara Hatke Jara Bache) हा चित्रपट २ जून
रोजी प्रदर्शित झाला. सारा अली खान (Sara Ali Khan) आणि विकी कौशलची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत असून
या सिनेमाने आतापर्यंत 22 कोटींहून अधिक रुपयांचा गल्ला कमावला आहे. तर कतरिना कैफ लवकरच टायगर 3
(Tiger 3) मध्ये सलमान खान (Salman Khan) सोबत झळकणार आहे. तसेच तिचे फोन भूत (Phone Bhoot)
व मेरी क्रिसमस (Merry Christmas) हे चित्रपटही येणार आहेत.

कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल हे वैवाहिक जीवनाचा आनंद घेताना दिसत आहे.
मध्यंतरी कतरिना प्रेगंन्ट असल्याच्या चर्चा होत होत्या. मात्र, यावर विकी कौशलच्या टीमने स्पष्टीकरणं देत
ही माहिती खोटी असून या केवळ अफवा आहेत असे सांगितले होते.

Web Title : Vicky Kaushal | vicky kaushal says katrina kaif makes budget meeting at house in every week and i enjoy it with popcorn

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lok Sabha Bypoll Election | ‘…तर मी पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार’, मनसे नेते वसंत मोरेंचं मोठं विधान

Palkhi Sohala 2023 – Pune Traffic Updates | श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल

ACB Trap Case News | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील अधिकारी 17 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात