विकी कौशलसोबतच्या ब्रेकअपनंतर हरलीन सेठीची ‘ही’ ब्रेकअप पोस्ट सोशलवर व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – उरी द सर्जिकल स्ट्राईक फेम विकी कौशल याची सध्या अनेक तरुणींमध्ये क्रेझ असल्याची दिसत आहे. सध्या विकी कौशल चांगलाच चर्चेत असतो. काही दिवसांपू्र्वी ब्रेकमुळे विकी चर्चेत आला होता. पुन्हा ऐकदा आता त्याची एक्स गर्लफ्रेंड हरलीन सेठी चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री हरलीन सेठीला विकी आणि तिच्या ब्रेकअपमुळे चांगलाच मानिसक धक्का बसला होता. ती नैराश्यात गेली होती.

सध्या हरलीनची एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. हरलीनने नुकतीच सोशल मीडियावर ब्रेकअप पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मी कुठून सुरुवात केली आणि मी कुठे पोहोचले. मी माझ्या आयुष्याचा हा रस्ता निवडला नव्हता, त्याच्या इच्छाशक्तीने तो तयार झाला होता.” असे हरलीनने आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे. हरलीनची ही पोस्ट सध्या झपाट्याने व्हायरल होत आहे.

काही दिवसांपूर्वी हरलीनने विकीला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले होते. अनेकांनी असेही म्हटले आहे की, त्यांच्या या ब्रेकअपचे कारण भूमी पेडणेकर आहे. त्याआधी त्यांचे ब्रेकअप कतरीनामुळे झाले आहे असेही म्हटले जात होते.

विकी कौशलच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर विकी लवकरच राकेश शर्मा यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. तख्त या करण जोहरच्या सिनेमात विकी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात करिना कपूर, रणवीर सिंग, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, अनिल कपूर आणि भूमी पेडणेकर हे कलाकरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

You might also like