पोलिस कर्मचाऱ्यांकडून सलग ३ दिवस ६५ वर्षाच्या पुरूषावर ‘लैंगिक’ अत्याचार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पोलीस कर्मचाऱ्यांनी ६५ वर्षीय पुरुषावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पंचरंगी, जालंधर येथील पोलीस चौकीत दिलेल्या तक्रारी नुसार ६५ वर्षीय गुरवीर सिंह (राहणार, बहराम गाव) यांनी सांगितले की, ते एका ढाब्यामध्ये जेवण बनवायचं काम करतात गुरुवारी ते ढाबा बंद करून घरी जात असताना तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी येऊन जेवणाची ऑर्डर दिली. तीनही पोलीस कर्मचारी नशेच्या अवस्थेत होते.

गुरवीर सिंह यांनी त्या पोलिसांची ऑर्डर घेतली व ते त्यांच्यासाठी जेवण बनवू लागले इतक्यात एक पोलीस कर्मचारी अचानकपणे आतमध्ये आला आणि अश्लील चाळे करू लागला. यावर गुरवीर सिंह यांनी त्याला विरोध केला मात्र त्याने इतर दोन कर्मचाऱ्यांना आतमध्ये बोलवले आणि गुरवीर सिंह यांचे कपडे फाडण्यास सुरुवात केली, आणि तीनही कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर जबरदस्ती करत अत्याचार केले.

पुढील शुक्रवारच्या दिवशीही हे तीनही कर्मचारी पुन्हा आले आणि त्यांनी त्याच्यावर पुन्हा अत्याचार केले. तो हात जोडून विनंती करत होता मात्र कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर जबरदस्ती केली. शनिवारच्या दिवशीही तीनही पोलिसांनी रात्री येऊन पुन्हा अत्याचार केले.

गुरवीर सिंह यांनी सांगितले की, यामुळे त्यांना चालण्यासाठी खूप त्रास होऊ लागला, जेव्हा घरच्यांनी विचारले कि काय झालं ? आणि त्यांना दवाखान्यात घेऊन गेले तेव्हा सगळ्या गोष्टी समोर आल्या. पोलिसात तक्रार देण्याचाही प्रयत्न केला मात्र पोलीस तक्रार घेण्यास तयार नव्हते आणि दवाखान्यामध्ये डॉक्टर रिपोर्ट देण्यास तयार नव्हते.

आरोग्यविषयक वृत्त –