पूर्व विदर्भातील जिल्ह्यात आता फक्त सीएनजीच धावणार

नागपुर : पोलीसनामा ऑनलाईन – पूर्व विदर्भातील नागपुरसह गोंदीया, भंडारा, चंद्रपुर व गडचिरोली या जिल्ह्यातील वाहने लवकरच सीएनजीवर धावणार असून, हे जिल्हे लवकरच डिझेल मुक्त करणार. असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी व्यक्त केला.

नागपुर महापालिकेतील डिझेलवर चालणाऱ्या परिवहन विभागाच्या एका बसचे सीएनजी गँसमध्ये परीवर्तित करण्यात आले. आयोजीत केलेल्या महापालिकेच्या सभागृहातील बसच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकूळे, महापौर नंदा जिचवार,आमदार सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, संदीप जोशी, विरोधीपक्षनेते तानाजी वनवे, महापालिका आयुक्त अभिजित बंगर आदी मान्यवर उपस्थित होते.

पूर्व विदर्भात धानाच्या पीकाचे उत्पादन मोठ्या प्रमानात होते. यामुळे धानाच्या चिपाटापासुन सीएनजी निर्मिती करुन त्यावर वाहने धावतील. असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केली. लवकरच महापालिकेची १५० बसेस आणि १५० वाहने ही सीएनजीवर करण्यात यावी,

यातून महापालिकेची ७० कोटींची बचत होईल.असे ही गडकरी म्हणाले. जर राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस सीएनजीत परिवर्तीत केल्या तर महामंडळाला होणारा तोटा कमी होऊन जास्त फायदा होईल, असा विश्वास ही गडकरी यांनी व्यक्त केला.