राष्ट्रवादीला ‘इथं’ बळ देणार शिवसेना, ‘टिकटिक’चा ‘आवाज’ वाढणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष अशी राष्ट्रवादीवर कायम टीका होत राहिली, त्यानंतर आता राष्ट्रवादीने आपले विदर्भात पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी खुद्द 80 वर्षांचा योद्धा म्हणवले जाणारे शरद पवार मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादीच्या या प्रयत्नाला शिवसेना देखील धावून आली आहे. त्याचमुळे विधिमंडळातच्या दोन्ही सभागृहात विदर्भासाठी घोषणा करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेससाठी वातावरणनिर्मिती केल्याचे दिसून आले.

राज्यातील सत्तानाट्य सुरु असताना शरद पवार दोन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर होते. अवकाळी पावसाने नुकसान सहन कराव्या लागलेल्या शेतकऱ्यांची त्यांनी भेट घेतली. त्यामुळे आता राज्यात महाविकासआघाडीची सत्ता आल्याने आणि भाजपची पिछेहाट झाल्याने शरद पवार विदर्भात पाय रोवण्याची संधी शोधत होते. विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 आमदार आहेत. त्यात वाढ करण्यासाठी जुन्या लोकांना देखील पक्षात पुन्हा कम बॅकची ते संधी देणार आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

अजित पवार आणि जयंत पाटलांनी नुकतीच नागपूरात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात विदर्भात पाय रोवण्याचे संकेत देण्यात आले. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात विदर्भासाठी विकासाला प्राधान्या देण्यात येणार असे सांगत वातावरण निर्मिती केली आहे. विदर्भात पाय रोवण्याचे शरद पवारांचे आता प्रयत्न सुरु आहेत.

उद्धव ठाकरेंनी घोषणा केली की विकासाला चालना देण्यासाठी जमशेदपूर भिलाईप्रमाणे मोठा स्टील प्लॅन्ट उभारणार आहोत. तेथील खनिज संपत्तीतून रोजगारनिर्मितीवर भर देण्यात येणार आहे. पवारांचे प्राधान्य नेहमीच शेती आणि शेतकरी राहिले आहेत.

गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर या विदर्भातील चार जिल्ह्यात भातशेती वाढवण्यावर आणि ब्राऊन राइस उद्योगाला विकासित करण्यासाठी भात शेती मिशन राबवून कृषी प्रक्रिया उद्योग सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढविण्याच्या दृष्टीने ठाकरे यांनी भाषण महत्वपूर्ण मानले जाते. विदर्भाच्या पर्यटन विकासामागे देखील शरद पवारांचे व्हिजन दिसून आले आहे.

मागील पाच वर्ष मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे नागपूरातील आहेत. आता ही सत्ता मुंबईतील उद्धव ठाकरेंकडे आली आहे. त्यामुळे विदर्भाकडे दुर्लक्ष होण्याची भीती व्यक्त केली जात होती. परंतु त्यानंतर विदर्भ माझे आजोळ असून मी विदर्भावर अन्याय होऊ देणार नाही. त्यांनी मिहानला बूस्ट देण्याची घोषणा करत नागपूरलाही विकासाच्या अजेंड्यावर असल्याचे संकेत दिले.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/