चोर नेत्यांकडून शिवाजी महाराजांचे नाव पुढे करुन विदर्भाची लूट

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त पश्चिम महाराष्ट्राचे नाहीत तर आमचेही राजे आहेत. परंतु काही चोर नेते छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव पुढे करुन विदर्भाची लूट करत असल्याचा आरोप ज्येष्ठ विदर्भवादी नेते अँड. श्रीहरी अणे यांनी केला आहे. शिवसेनेचे नाव घेता त्यांनी हा अप्रत्यक्षपणे आरोप केला आहे. नागपुरात आयोजित संकल्प विदर्भ निर्मिती सभेत ते बोलत होते.

आगामी निवडणुकीसाठी विदर्भवादी असलेल्या सर्व संघटना एकत्र आल्या असून विदर्भ निर्माण महासांघाची निर्मिती करण्याली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या महासंघाच्या वतीने या सभेचे आयोजन करण्यात आले होते. आणे पुढे म्हणाले, आम्हाला जय भवानी जय शिवाजी किंवा जय महाराष्ट्र म्हणायची लाज वाटत नाही. मात्र, आम्ही तितक्याच ताकदीन जय विदर्भ म्हणतो.

आमचं महाराष्ट्राशी वैर नाही तर आमचं त्या चोर पक्षांशी आणि नेत्यांशी वैर आहे ज्यांनी विदर्भाची लूट चालवली आहे. काही नेते शिवाजी महाराजांना पुढं करत मागं लपतात. शिवाजी महाराजांना काढून घेतलं तर या नेत्यांचा खरा मुखवटा दिसेल, अशी टीकाही त्यांनी सेनेच्या नेत्यांवर अप्रत्येक्षपणे केली.