Video : भाजपा नेत्याच्या नातीच्या एन्गेजमेंटला जनसागर !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    गुजरातमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढू लागले आहेत. गुजरातमध्ये कोरोनाव्हायरसची दुसरी लाट आली आहे. गुजरातमध्ये एकूण कोरोना बाधितांची संख्या ही २ लाख १० हजारांवर गेली आहे. यामुळे अहमदाबाद, सूरतसह चार महानगरांमध्ये नाईट कर्फ्यु लावण्यात आला आहे. दुसरीकडे भाजपचे नेते नियम उडताना दिसत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

कोरोना व्हायरचे संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. यासाठी लोकांना लग्नसमारंभ या कार्यक्रमांना काही बंधने आणली आहेत . राज्यात सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री कांती गामितच्या नातीच्या एन्गेजमेंटचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये हजारो लोक जमलेले दिसत आहेत. गरबा गाताना दिसताहेत. कोरोना काळात केंद्राच्या आणि राज्याच्या नियमांना पायमल्ली तुडवले आहे. तसेच भाजपचे नेते आणि तापी जिल्ह्यातील निर्धार मतदार संघाचे माजी आमदार गावित यांनी या नियमांचे उल्लंघन केले आहे. हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर गृहमंत्री प्रदीप सिंह जडेजा यांनी व्हिडिओचा तपास करून कारवाईचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी कांती गामित यांना पोलिस स्थानकात बोलावून चौकशी केली

आता पोलिसांवरही होणार कारवाई

कांती गामित यांच्या नातीच्या साखरपुड्याचे आयोजन तापीच्या डोसवाडा गावात करण्यात आले होते. यामध्ये सहा हजार पेक्षा अधिक लोक गरबा खेळताना दिसत आहे. तर काही आजूबाजूला उभे राहिलेले दिसत आहेत. या व्हिडिओत दिसणारे सर्व लोकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमावेळी ड्युटीवर असलेल्या पोलिसांवरही कारवाई केली जाणार आहे.

पोलिसांनी मंगळवारी गावित यांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले होते. चौकशीत समोर आले कि त्यांच्या मुला मुलीचा साखरपुडा होता. त्यामध्ये पंधराशे ते दोन हजार लोकांचे जेवण केले होते; मात्र व्हाट्सअप वर लोकांना माहिती मिळाल्याने मोठी गर्दी झाली. आमच्याकडून चूक झाल्याचे मान्य आहे.

सर्व गाव आदिवासी भागात येतात. त्यामुळे या लोकांना मी नाही म्हणू शकलो नाही.