संसदेत अमित शाहांनी औवेसींना सुनावलं ; म्हणाले, ‘ऐकूण घ्यायला शिका’ (Video)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या मोदी सरकारचे सत्तेत दुसरे पर्व सुरु आहे. या पर्वाला सुरुवात होऊन २-३ महिनेच झाले आहेत. तर नवनवीन घडामोडी देशाच्या राजकारणात पहायला मिळत आहेत. त्यात संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. त्यातील आजच्या लोकसभेतील अधीवेशनात भाजपाध्यक्ष अमित शहा आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन औवेसी यांच्यात शाब्दीक युद्ध पहायला मिळाले. या युद्धात अमित शहा यांनी औवेसींना चांगलेच खडसावले आहे.

लोकसभेत एनआयए म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीला अधिक मजबूत बनविणारे सुधारणा करण्यासाठीचे विधेयक संमत करण्यात आले. त्यावर सकारकडून खासदार सत्यपालसिंह बाजू मांडत होते. तेव्हा त्यांनी मुंबईने दहशतवादाला खूप सहन केले आहे, कारण मुंबईत नेहमीच राजकीय चश्म्यातून दहशतवाद पाहिला गेला. तसेच, हैदराबाद बॉम्बस्फोट प्रकरणी पोलिसांनी काही संशयित अल्पसंख्यांक समुदायाच्या नागरिकांना ताब्यात घेतले. त्यावेळी, चक्क मुख्यमंत्र्यांनी तसे न करण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे पोलीस आयुक्तांना नोकरीवरुन काढून टाकण्यापर्यंतही सुनावण्यात आल्याचे म्हटले.

मात्र सत्यपाल सिंह यांच्या वक्तव्यावर एआयएमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन औवेसी यांनी आक्षेप घेतला. तसंच तेव्हा त्यांनी सत्यपाल सिंह यांचे भाषण थांबविण्याचा प्रयत्नही केला. तेव्हा अमित शहा यांनी उठून औवेसी यांना उद्देशून काही म्हटले की औवेसी साहब सुनने की ताकद रखिए, जब ए राजा बोल रहे थे तब आप क्यों नही खडे हुए, एैसे नही चलेगा, आपको सुनना भी पडेगा.. असं म्हटलं. त्यानंतर काही वेळी सभागृहात गोंधळच होता.

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या