Video : इरफान खानच्या मुलाचे भाषण ऐकून मोठं-मोठे सेलेब्रिटीएस झाले भावुक

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   दिवंगत अभिनेता इरफान खानच्या निधनाने सर्वांना मोठा धक्का बसला. वयाच्या 54 व्या वर्षी कर्करोगामुळे त्यांचे निधन झाले. इरफाननंतर त्याचा मोठा मुलगा बाबील खानने सोशल मीडियावर चाहत्यांशी संपर्क साधला आणि इरफान खान यांची जुनी छायाचित्रे शेअर केली. बाबील आपल्या वडिलांचा वारसा घेत असल्यासारखे दिसत आहे. अलीकडेच फिल्मफेअर अवॉर्ड्स 2021 मध्ये, बाबेलने त्यांचे दिवंगत वडील इरफानसाठी हा पुरस्कार स्वीकारला. ज्याचा प्रोमो चॅनलने शेअर केला असून रितेश देशमुख यांनी इरफान खानचा भावनिक प्रवास सांगितला.

याच सोहळ्यात इरफान चा मोठा मुलगा बाबील खान याने वडिलांचा पुरस्कार स्वीकारताना काही भावुक क्षण इरफान च्या चाहत्यांसमोर मांडले. आयुष्मान खुराणा कडून पुरस्कार घेताना तो असं देखील म्हणलं कि तो सगळ्यांसोबत हि बॉलीवूड इंडस्ट्री पुढे घेऊन जाऊ इच्चीत आहे.