भाजपच्या ‘या’ मंत्र्याची निवडणूक अधिकाऱ्यांशी हुज्जत, हेलिकॉप्टर तपासणीला दिला नकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हेलिकॉप्टरची झाडाझडती घेण्यास आलेल्या अधिकाऱ्यास धर्मेंद्र प्रधान यांनी अर्वाच्य भाषा करत वाद घातला आहे. धर्मेंद्र प्रधान अधिकाऱ्यांशी वाद घालतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आता तिसऱ्या टप्य्यात मतदानासाठी सर्वच पासक जोरदार तयारी करत आहेत. याचदरम्यान, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान मंगळवारी ओडिशातील संबलपूर येथे पोहंचले. त्यानंतर निवडणूक आयोगाचे भरारी पथक धर्मेंद्र प्रधान यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यासाठी घटनास्थळावर दाखल झाले. त्यावेळी, प्रधान यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे कागदपत्रे मागितली. तसेच या पथकातील अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी घातलेल्या वादामुळे हेलिकॉप्टर तपासणी साठी आलेले अधिकारी हेलिकॉप्टर न तपासताच परत फिरले. असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विशेष म्हणजे, याचसंदर्भात आणखी एक व्हीडिओ सोशल मीडियावर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये, राऊरकेला येथे पटनाईक येथील निवडणूक प्रचारादरम्यान त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली असे दिसत आहे. इतकेच नव्हे तर, ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बीजू जनता दलचे प्रमुख नवीन पटनाईक यांच्याही हेलिकॉप्टरवर भरारी पथकाने धाड टाकली आहे. त्यामध्ये पटनाईक यांनी भररी पथकाला संपूर्ण सहकार्य करत, हेलिकॉप्टरची तपासणी करू दिली. असे दिसत आहे.

विशेष म्हणजे, कालच ओडिशामधील संबलपूर लोकसभा मतदारसंघात आयोजित सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आता त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्यास गेलेल्या मोहम्मद मोहसिन या आयएएस अधिकाऱ्याला निवडणूक आयोगाने निलंबित केले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like