माथेफिरू प्रियकरानं चक्क घरासमोर प्रेयसीवर केला गोळीबार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यातील राठ कोतवाली परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका माथेफिरूने आपल्या प्रेयसीच्या घरावर दिवसा- उजेडी गोळीबार केला आहे. माथेफिरु तरुणाचे हे कृत्य सीसीटीव्हीत कैद झाले असून सध्या पोलिसांकडुन सीसीटीव्हीच्या आधारावर मारेकऱ्याचा शोध सुरू आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, खुशीपूर येथे राहणारे शिवकुमार सोनी यांच्या परिवारावर त्याच भागात राहणाऱ्या अतुल सोनीने फायरिंग केली. हाल्याच्यावेळी शिवकुमार सोनींची आई सावित्री सोनी आपल्या नातीसोबत घरातील दुकानात बसली होती. शिवकुमार सोनी यांनी सांगितले की, त्यादरम्यान पठानपुरा गंज मोहल्ला येथे राहणारा अतुल सोनी बाईकवरुन आला आणि दुकानासमोर बाईक थांबवत त्याने आई व मुलीवर गोळी झाडली. सुर्दैवाने गोळी दुकानाच्या आतील दरवाज्याला भेदून गेली. ज्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही.

पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यासाठी छापेमारी सुरू केली आहे. या घटनेमागे प्रेम प्रकरण असले तरी अद्याप नेमके कारण समोर आलेले नाही.