Video : खरेच आमिर खानने पिठाच्या पिशवीतून वाटले 15000 रुपये ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   देशभरात पसरलेल्या कोरोनामुळे नागरिकांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे . कोरोना विषाणूशी लढण्यासाठी सिनेकलाकारही पुढे सरसावले आहेत. अनेक जण आपल्या आर्थिक क्षमतेनुसार मदत करत आहेत. काही जण पैसे देत आहेत, तर काही गरजेच्या वस्तू. परंतु अभिनेता आमिर खानने मात्र गरजूंच्या मदतीसाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. त्याने एक किलो पिठाच्या पिशवीतून 15 हजार रुपये वाटल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील व्यक्ती आमिर खाने 15 हजार रुपये वाटल्याचा दावा करत आहे. मध्यरात्री गरीबांच्या वस्तीत एक ट्रक आला. या ट्रकमध्ये एक-एक किलो पिठाच्या पिशव्या होत्या. ज्या लोकांना पिठाची गरज आहे त्यांनी ट्रकजवळ यावे आणि पिठ घेउन जावे अशी घोषणा करण्यात आली. परंतु एका कुटुंबाला केवळ एकच पिशवी मिळणार होती. ही पिशवी जेव्हा गरीबांनी खोलून पाहिली तेव्हा त्यात 15 हजार रुपयांच्या नोटा सापडल्या. अशी अनोखी शक्कल लढवून कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता आमिरने लोकांची मदत केली आहे. असा दावा या व्हिडीओमधील व्यक्तीने केला आहे.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मात्र या व्हीडिओच्या सत्यतेबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. तसेच आमिर खानने देखील याबाबत कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.