पोलिसाच्या हप्तेखोरीची ‘क्लिप व्हायरल’!

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – तोफखाना पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याची आणखी एक ‘क्लिप व्हायरल’ झाली आहे. त्यामुळे तोफखाना पोलीस ठाणे पुन्हा वादाच्या भोव-यात सापडले आहे. तीनच दिवसांपूर्वी पैसे घेतानाची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे या पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी निलंबित झाला होता. ही घटना ताजी असतानाच आज आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने तोफखाना पोलीस ठाणे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. त्यामुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

जिल्हा पोलीस दलाची सूत्रे पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी हाती घेतल्यापासून त्यांनी पोलीस खात्यातील भ्रष्टाचाराविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक ईशू सिंधू ह्या पोलीस खात्यातील भ्रष्टाचाराविरुद्ध आक्रमक असताना तीन दिवसापूर्वी तोफखाना पोलीस ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी पैसे घेतानाचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याची दखल घेऊन सिंधू यांनी त्या कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित केले.

त्यानंतर आज पुन्हा एकदा तोफखाना पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराचे मटका व्यवसायिकाकडून पैसे घेतानाची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात मटका बुकी व पोलीस कर्मचारी शहरातील काही मटका व्यवसायिकांची नावे घेत आहेत. सदर व्यक्ती शहरातील बडे मटका बुकी असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात पोलीस अधीक्षक ईशू सिंधू हे नेमके काय करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like