पाटणातील काँग्रेसच्या बैठकीत तुफान राडा; नेत्यांवरच फेकल्या खुर्च्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवापासून काँग्रेसच्या बैठकीत गदारोळ पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे दोन दिवसांपासून बिहार काँग्रेसचे नवे प्रभारी भक्त चरण दास हे दाखल झाले आहेत. ते सातत्याने पक्ष कार्यकर्त्यांसोबत बैठका घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी मंगळवारी देखील सदाकत आश्रम येथे काँग्रेसने किसान मोर्चाची बैठक बोलावली होती. त्यावेळी तुफान राडा झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एवढेच नाही तर काँग्रेस नेत्यांनी बैठकीत काँग्रेसच्याच अन्य नेत्याच्या अंगावर संतापाच्या भरात खुर्ची फेकल्याचे दिसत आहे.

बिहारकाँग्रेसमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवापासून काँग्रेसच्या बैठकीत गदारोळ पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपासून बिहार काँग्रेसचे नवे प्रभारी भक्त चरण दास हे दाखल झाले आहेत. ते सातत्याने पक्ष कार्यकर्त्यांसोबत बैठका घेत आहेत. मंगळवारीही त्यांनी सदाकत आश्रम येथे काँग्रेसने किसान मोर्चाची बैठक बोलावली होती. कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार होते. बैठकीला सुरुवात होताच उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू झाला. एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली. तसेच संतापाच्या भरात नेत्यांवर खूर्ची देखील फेकण्यात आल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. भक्त चरण दास यांनी सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्ते थांबले नाहीत. त्यांचा गोंधळ पाहायला मिळाला. आम्ही आपल्या राज्यातील पक्षाच्या सुधारणांसाठी एकत्र आलेलो आहोत. कृपया तुमच्या भांडणांचा आणि व्यक्तिगत वादांचा यामध्ये समावेश करू नका असं देखील काँग्रेसच्या एका नेत्याने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

…अन् रागाच्या भरात भाजपा आमदाराने पुजेची आसनव्यवस्था लाथेनं उडवली

कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं नाही तसेच भूमीपूजन फलकावर आमदाराचं नाव लिहिलं नसल्याने
उत्तर प्रदेशच्या जौनपूरमध्ये शहीद स्मारकाच्या भूमीपूजन सोहळयात भाजपाच्या एका आमदाराने जोरदार गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. रमेश चंद्र मिश्रा असं या आमदाराचं नाव आहे. फलकावर नाव नसल्याचं पाहून त्यांनी अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. आमदाराने घातलेल्या गोंधळाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

जौनपूर जिल्ह्यातील बदलापूरमधील ग्रामस्थांनी प्रशासनाच्या सहाय्याने शहीद स्मारकाच्या भूमीपूजन सोहळ्याचं आयोजन केलं होतं. जिल्हाधिकारी (डीएम) दिनेश कुमार सिंह हे स्मारकाच्या प्रवेशद्वाराचं लोकार्पण करणार होते. होम-हवन तसेच पुजेची सर्व तयारी कार्यक्रमस्थळी करण्यात आली होती. याच दरम्यान आपल्याला या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आलेलं नाही तसेच फलकावर आपलं नाव नाही हे समजल्यानंतर रमेश चंद्र मिश्रा यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. स्थानिक आमदार असूनही आपल्याला कार्यक्रमाला का बोलावलं नाही? अशी त्यांनी विचारणा केली.