Video : शर्टलेस रितेश देशमुखनं जेनेलियाला केलं Kiss ! कपलचा ‘रोमँटीक’ व्हिडीओ सोशलवर तुफान व्हायरल

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलवूड स्टार रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अ‍ॅक्ट्रेस जेनेलिया डिसूजा (Genelia D’Souza) यांनी 8 वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली होती. आज ते बॉलिवूडमधील क्युट कपल म्हणून ओळखले जातात. नुकतेच त्यांच्या लग्नाला आठ वर्षे पूर्ण झाली. रितेश (Riteish Deshmukh) आणि जेनेलियाचा (Genelia D’Souza) एक रोमँटीक व्हिडीओ समोर आला आहे जो सध्या चर्चेत आहे.

जेनेलियानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात जेनेलिया आणि रितेश यांचा रोमँटीक अंदाज दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत तिनं खास कॅप्शनही दिलं आहे. तिनं लिहिलंय की, फॉरेव्हरवाली लव्ह स्टोरी. काही तासातच हा व्हिडीओ लाखो लोकांनी लाईक केला आहे आणि पाहिलं आहे. व्हिडीओ रितेश शर्टलेस दिसत आहे.

रितेश आणि जेनेलिया यांचा सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. काहींनी तर व्हिडीओ शेअरही केला आहे.

रितेशच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तो बागी 3 या सिनेमात दिसला होता. या सिनेमात त्याच्या सोबत टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर आणि अंकिता लोखंडे हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. 6 मार्च 2020 रोजी हा सिनेमा रिलीज झाला. बॉक्स ऑफिसवर सिनेमा बक्कळ कमाई करताना दिसला परंतु कोरोनाचा कहर सुरू झाल्यानं थिएटर बंद करण्यात आले आणि सिनेमाच्या कमाईला मध्येच ब्रेक लागला.