मोबाईलवर व्हिडिओ गेम ‘खेळता-खेळता’ लागली झोप, सकाळी आढळला मृतदेह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेकांना मोबाईल चार्जिंगला लावून त्यावर काम करण्याची सवय असते मात्र एका पंचवीस वर्षाच्या मुलाला मोबाईल चार्जिंगला लावून झोपने मोठे महागात पडले आहे. यामुळे तरुणाला आपले प्राण गमवावे लागले आहेत.

dead

थायलँडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंचवीस वर्षीय तरुण रात्री झोपण्यापूर्वी मोबाइल चार्जिंगला लावून त्यावर गेम खेळत होता. अचानक त्याला झोप लागली त्यानंतर सकाळी जेव्हा त्याच्या आई वडिलांनी मुलाच्या खोलीचा दरवाजा उघडला तर मुलाचा एक हात जळालेला होता आणि त्याचा मृत्यू देखील झालेला होता.

phone charging while sleeping

पोलिसांनी याबाबतची पाहणी केली असता तरुणाला करंट लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. तसेच नातेवाइकांनी हे देखील सांगितले की, हा तरुण अनेकदा मोबाइल चार्जिंगला लावून त्यावर गेम खेळत असे. या आधी कजाकिस्तानमध्ये देखील एका चौदा वर्षीय मुलीचा मोबाईलची बॅटरी फुटल्याने मृत्यू झाला होता.

मोबाइल चार्जिंग

अनेकांना मोबाईल फोन चार्जिंगला लावून झोपण्याची सवय असते, मात्र फोन चार्जिंवर लावून त्यावर काम करणे किंवा झोपताना फोन बाजूला ठेवणे धोक्याचे आहे.

Visit : Policenama.com