Fact Check : पोलिस अधिकार्‍यानं भरदिवसा मॉलच्या समोर जोडप्याची गोळ्या झाडून केली हत्या? जाणून घ्या Viral Video चं सत्य (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक पोलिस अधिकारी मॉलसमोर जोडप्यावर गोळी झाडतो आणि यामध्ये या दोघांचा मृत्यू होतो. या व्हायरल व्हिडिओची गंभीर दखल अतिरिक्त पोलिस अधीक्षक राहुल श्रीवास्तव यांनी घेतल्याने या घटनेमागील सत्य आता समोर आले आहे.

एका मॉलसमोर पहिल्यांदा तरुणावर पोलिसाकडून गोळी झाडण्यात येते. त्याच्यासोबत असलेली तरुणी या प्रकाराने मोठमोठ्याने आरडाओरड करत शिव्याही देते. त्यानंतर व्हिडिओमध्ये दिसणारा पोलिस पुन्हा त्या तरूणीकडे जातो आणि तिच्यावरही गोळी झाडतो. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यानंतर आता राहूल श्रीवास्तव यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की #FactCkeck एका रेस्टॉरंटच्या बाहेर एका पोलिसाकडून हत्या झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामुळे यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, याची माहिती मिळाल्यानंतर कॅफे मॅनेजरकडे विचारपूस करून याची सत्यता समजावून घेतली. त्यामध्ये हे समजले की या व्हिडिओचे शुटिंग हरियाणाच्या करनाल येथील फ्रेंड्स कॅफेच्या बाहेर करण्यात आले. हा व्हिडिओ वेबसीरीजसाठी काढण्यात आला आहे.

दरम्यान, राहुल श्रीवास्तव यांनी ट्विरवरून माहिती दिल्यानंतर युजर्सने अशाप्रकारच्या वेबसीरीजवर बंदी आणण्याची मागणी केली. अशा वेबसीरीजमुळे पोलिसांच्या प्रतिमेला धक्का पोहोचू शकतो. त्यामुळे अशाप्रकारे शुटिंगवर बंदी आणावी, अशी मागणी केली जात आहे.