‘हे’ माजी मुख्यमंत्री भरसभेत ‘ढसाढसा’ रडले, म्हणाले… (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्नाटक नाट्यानंतर आता माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या डोळ्यात पुन्हा एकदा पाणी आले. स्टेजवर कार्यकर्त्यांशी बोलतानाच त्यांना रडू कोसळले. कर्नाटकच्या मंड्या जिल्ह्यातील आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना सध्याच्या राजकीय परिस्थितीवरुन त्यांच्या डोळ्यात पाणी आले. मी काय चूक केली म्हणून मंड्या येथील जनतेने पराभूत केले. मला राजकारण नको, मुख्यमंत्रिपद देखील नको, फक्त तुमचं प्रेम हवं आहे असे ही त्यांनी जनतेला सांगितले.

राजकारणात कुणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही अशी परिस्थिती झाली आहे, सध्याचे राजकारण न समजणारं झालंय असे म्हणत कुमारस्वामींनी जनतेसमोर आपले अश्रूंना वाट मोकळी केली. माझ्या मुलाने निवडणूक लढावी असे मला मला वाटत नव्हते परंतू त्याच्या समर्थकांच्या आग्रहामुळे त्याने निवडणूक लढवली, परंतू त्याचा तेथे पराभव झाला.

माझ्या सारख्या व्यक्तीने राजकारणात असता कामा नये, मला अजिबात समजत नाही की राजकारणात कुणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही असेही कुमारस्वामी म्हणाले. यापूर्वी देखील प्रचार रॅलीत ते भावूक झाले होते. तेव्ही मी भावूक आहे असहाय्य नाही असे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते.

Visit : Policenama.com